Baramati Election: बारामतीत आज प्रचाराचा धुरळा; ‘या’ दिग्गजांच्या होणार सभा..जाणून घ्या

प्रभात वृत्तसेवा
बारामती – बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून उद्या दि (१८) रोजी बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या सभा होणार आहेत. बारामतीत या नेत्यांच्या तोफा धडाडणार असून कोण काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बारामती नगर परिषदेची निवडणूक रंगत आली असून प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या उमेदवारांसाठी शहरातील शारदा प्रांगण येते प्रचार सभा घेणार आहेत. सांगता सभेत अजित पवार काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बारामतीत गटातटाचे राजकारण नाराजीचा सूर यावर ते मतदारांना काय आवाहन करतील हे देखील महत्त्वाचे ठरेल.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवारांसाठी देखील प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे मैदानात उतरणार आहेत. शहरातील महावीर भवन येथे सांगता सभेत ते मतदारांना आवाहन करणार करतील. यावेळी योगेंद्र पवार देखील मार्गदर्शन करणार आहेत. निवडणुकीत बहुजन समाज पार्टीच्या वतीने लक्ष्मण हाके यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
शहरातील बस स्थानकासमोर ही सभा पार पडणार आहे. त्यापूर्वी बहुजन समाज पार्टीच्या उमेदवारांसाठी हाके पदयात्रेत सहभागी होणार आहेत. बहुजन समाज पार्टीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करण्याच्या दिवशी देखील हाके उपस्थित होते.




