पुणे जिल्हा | बनसुडेचा व्हॉलिबॉलचा संघ जिल्हास्तरावर

पळसदेव, (वार्ताहर)- इंदापूर तालुकास्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धेत एल. जी. बनसुडे स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमधील 14 वर्षे वयोगाटीतील मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक मिळवल्याने संघाची जिल्हास्तरावर निवड झाली आहे. तर 17 वर्षे वयोगटातील मुलांच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळवला आहे.
पुणे जिल्हा शालेय कबड्डी स्पर्धा 2024-25 तालुका स्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा 17 व 19 वर्ष वयोगटात मुले, मुली या स्पर्धा पळसदेव येथे पार पडल्या यामध्ये बनसुडे स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मधील 19 वर्षे मुले व मुली या दोन्ही संघांनी उत्कृष्ट कौशल्य सादर करत तृतीय क्रमांक मिळवला असल्याची माहिती विद्यालयाच्या प्राचार्य वंदना बनसुडे यांनी दिली.
व्हॉलिबॉल स्पर्धेत 14 व 17 वर्षेवयोगटातील मुलांच्या संघाने तर 17 वर्षे कबड्डी स्पर्धेत मुले व मुलींच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सर्व खेळडुंसह त्यांचे मार्गदर्शक क्रीडा शिक्षक रुपेश भालेराव, प्रकाश वायकर यांचे संस्थेचे अध्यक्ष हनुमंत बनसुडे, उपाध्यक्ष डॉ. शीतल कुमार शहा,
कार्याध्यक्षा नंदा बनसुडे, प्राचार्या वंदना बनसुडे, संस्थेचे विश्वस्त, सर्व विभागाचे विभाग प्रमुख, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी ,सर्व पालक वर्ग यांनी अभिनंदन करीत सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला.
यावेळी संस्थेचे सचिव नितीन बनसुडे, मुख्याध्यापक राहुल वायसे, डॉ. शिवाजी मोरे, म्हसोबावाडी विद्यालयाचे मुख्याध्यापक भोंग, प्रा सागर मोरे, रणजित बनसुडे आदी उपस्थित होते.





