महत्वाची बातमी! सलग तीन दिवस बंद राहणार बॅंका; तत्काळ करून घ्या महत्वाची कामं

नवी दिल्ली – या आठवड्यात तुम्हाला बॅंकेशी संबंधीत महत्वाची कामे असतील तर गुरूवारपर्यंत पूर्ण करून घ्या. 24 डिसेंबरनंतर सलग तीन दिवस बॅंका बंद असणार आहेत.
31 डिसेंबरपूर्वी सर्व करदात्यांना त्यांचे कर भरावे लागतात. लक्षात ठेवा की तुम्हाला हे काम गुरूवारपर्यंत करायचे आहे.
प्रत्येक महिन्याच्या दुसर्या आणि चौथ्या शनिवारी बॅंका बंद असतात. यावेळी 26 डिसेंबर रोजी महिन्याचा चौथा शनिवार येत आहे. यानंतर रविवारी साप्ताहिक सुट्टी असते. तसेच 25 डिसेंबर रोजी ख्रिसमस आहे. त्यामुळे यावेळी शुक्रवारी बँका बंद राहतील. ख्रिसमस हा राष्ट्रीय सुट्टीचा दिवस आहे. त्यामुळे बँका सलग तीन दिवस बंद राहतील.
हा वर्षाचा शेवटचा आठवडा असल्याने सर्वांना त्यांच्या पैशांशी संबंधित अनेक कामे करावी लागतील. म्हणून तुम्हीही बँकेचे काम वेळेत पूर्ण करावे.
1 जानेवारी 2021 पासून पैसे आणि बँकेशी संबंधित बरेच नियम बदलतील. आयकर परताव्यासाठी तुम्हाला बँक स्टेटमेंट, व्याज उत्पन्नाचे प्रमाणपत्र, फॉर्म 26 एएस अशी अनेक प्रकारची कागदपत्रे बॅंकेकडून घ्यावी लागतील.





