“राज्यातील बँकांचे व्यवहार मराठीत झाले पाहिजे, यासाठी…”; राज ठाकरेंच्या भेटीनंतर उदय सामंतांची प्रतिक्रिया

Uday Samant Meet Raj Thackeray | शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ येथे भेट घेतली. राज ठाकरेंच्या भेटीनंतर उदय सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि या भेटीचे कारण स्पष्ट केले आहे. या भेटीत राज ठाकरेंनी मराठीच्या आग्रहाबाबत काही सूचना केल्या असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.
उदय सामंत यांनी म्हटले की, ‘आज मराठीच्या संदर्भात ज्या घडामोडी चालू आहेत. त्यांसंदर्भात राज ठाकरेंनी मला भेटायला बोलवलं होतं. येथे मी एकनाथ शिंदेंची परवानगी घेऊन आलो होतो. मी राज ठाकरेंना दुसऱ्यांदा भेटत आहे. महाराष्ट्रात ज्या काही संस्था, बँका आहेत त्यात मराठीच्या बाबतीत निर्णय घेतला जातो किंवा तिथे ज्या काही गोष्टी घडतात. त्याचा प्रतिबंध कसा करायचा. त्या संदर्भात राज ठाकरेंनी काही सूचना केल्या आहेत. त्यासंदर्भात त्या मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून त्यात काय सुधारणा करता येतील याचे प्रयत्न करू’, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
“महाराष्ट्रात अनेक भाषा बोलल्या जातात. अनेक राज्यातील लोक महाराष्ट्रात आले आहेत. अनेक ठिकाणी मराठी भाषिकांवर अन्याय केला जातो दादागिरी केली जाते. त्यावर काहीतरी कायदेशीर वलय असलं पाहिजे, असं मत राज ठाकरेंचे आहे. राज्यातील बँकांचे व्यवहार मराठीत झाले पाहिजे यासाठी सर्व समित्याची बैठक घेईन आणि काय कारवाई करता येतील याबाबत निर्णय घेऊ,” असंही सामंत यांनी म्हटलं आहे. Uday Samant Meet Raj Thackeray |
‘राज ठाकरेंची भूमिका आणि तीच शासनाचीही भूमिका’
‘महाराष्ट्रात जी व्यक्ती राहते तिला मराठी आलीच पाहिजे. मराठीचा त्यांनी सन्मान केला पाहिजे. बाकीच्या भाषांबद्दल नक्कीच आदर आहे. कुठेही अनादर आम्ही केलेला नाही. पण माझ्या भाषेचा सन्मान कायमस्वरुपी टिकला पाहिजे. ही राज ठाकरेंची भूमिका आहे आणि तिच शासनाचीही भूमिका आहे. बँक कर्मचाऱ्यांनी घाबरण्याचं कारण नाही. बँकाही आपल्याला आवश्यक आहेत. मराठी बोलण्याचा आणि मराठी भाषेवर अन्याय न करण्याचा हा मुद्दा आहे. मराठी भाषेत जर कुणी बोलत असेल तर त्याचे खच्चीकरण करण्याचा काही ठिकाणी जो प्रकार घडला त्याबाबत हा विषय आहे. त्यामुळे बँकांच्या अधिकाऱ्यांनी घाबरून काम करावे असं काही नाही. आम्ही शासन म्हणून बँकांसोबत आहोत असंही उदय सामंत यांनी सांगितले. Uday Samant Meet Raj Thackeray |
“महाराष्ट्रात ज्या बँका आहेत त्यांचा संवाद सामान्य माणसांशी होत असतो, जे व्यवहार आहेत ते मराठीत झाले पाहिजेत ही आमची भूमिका आहे. त्यासाठी येत्या ८-१० दिवसांत पोलीस विभाग आणि राज्यातील जिल्हाधिकारी यांची बैठक घेणार आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी एक समिती गठीत केली आहे. त्या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आहेत आणि सदस्य पोलीस अधीक्षक आहेत,” अशी माहितीही असे मंत्री उदय सामंत म्हणाले. Uday Samant Meet Raj Thackeray |
हेही वाचा:





