मुंबई – सर्वांच्या हृदयावर राज्य करणारा पंजाबी गायक एपी धिल्लन त्याच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आला आहे. सध्या त्याचे गाणे जबरदस्त हिट असून एपी ढिल्लोंची फॅन फॉलोइंगही करोडोंमध्ये आहे. पंजाबी म्युझिक इंडस्ट्रीत गायक खूप लोकप्रिय झाला आहे. अलीकडे, एपी त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल देखील नेहमीच चर्चेत असतो.
View this post on Instagram
यापूर्वी एपी ढिल्लोंने त्याच्या एका गाण्यात खुशी कपूरचे नावाचा उल्लेख केला होता यांनतर त्यांच्या डेटिंगच्या बातम्या देखील व्हायरल झाल्या होत्या. मात्र सिंगरच्या खऱ्या मैत्रिणीचे नाव समोर आले आहे. दोघेही अलीकडे अनेकदा एकत्र स्पॉट झाले. आजकाल बनिता संधू एपी ढिल्लोंसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे. बनिता संधूने एपी ढिल्लोंसोबतच रिलेशनशिप कंफर्म केलं आहे.
बनिता संधू वयाच्या 11 व्या वर्षापासून चित्रपटसृष्टीत आहे. वयाच्या 25 व्या वर्षी तिने वरुण धवनच्या ‘ऑक्टोबर’ चित्रपटातून इंडस्ट्रीत पदार्पण केले. या चित्रपटात वरुण धवनसोबत बनिता दिसली होती. त्यानंतर बनिता विकी कौशलसोबत ‘सरदार उद्यम सिंह’ चित्रपटात दिसली. सध्या या कपलचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नुकतीच एपी धिल्लनची एक माहितीपट-मालिका जाहीर करण्यात आली. तिचे नाव आहे एपी ढिल्लों: फर्स्ट ऑफ अ काइंड’ जो प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाला. दरम्यान, एपी ढिल्लोंनेही तिच्यासोबतच डेटिंगला अधिकृत केले. एपी ढिल्लों अभिनेत्री बनिता संधूला डेट करत आहे. दोघांचे रोमँटिक फोटोही समोर आले आहेत. सोशल मीडियावर लीक झालेल्या या फोटोंमध्ये एपी ढिल्लों आणि बनिताची केमिस्ट्री अप्रतिम आहे.