Bangladesh : बांगलादेशी हिंदूंचा जीव धोक्यात ! गर्भवती महिलेलाही सोडले नाही, एकाच कुटुंबातील ४ जणांची हत्या

Bangladesh : बांगलादेशात हिंदूंना किती धोका आहे याचा अंदाज यावरून लावता येतो की इथले अतिरेकी गट गर्भवती महिलांनाही सोडत नाहीत. किशोरगंज जिल्ह्यातील भैरब शहरातून हिंसाचाराचे ताजे प्रकरण समोर आले आहे, जिथे एका अपार्टमेंटमध्ये हिंदू कुटुंबातील 4 लोक मृतावस्थेत आढळले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, 32 वर्षीय जॉनी बिस्वास, त्यांची गर्भवती पत्नी आणि त्यांची दोन मुले अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांनी बुधवारी खुनाचा गुन्हा दाखल केला. बांगलादेशात शेख हसीना यांचे सरकार उलथून टाकल्यापासून हिंदूंवर प्रचंड अत्याचार होत आहेत.
ही आत्महत्या नसून ही हत्या आहे :
एवढ्या क्रूरतेनंतर पोलीस प्रशासनाचा निर्दयीपणाही समोर आल्याचं दिसून येत आहे. पोलीस प्रशासन या हत्येला आत्महत्या म्हणून मांडत आहे. पत्नी आणि मुलांची हत्या केल्यानंतर जॉनीने आत्महत्या केल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले आहे.
परिसरात तणाव आणि भीतीचे वातावरण :
या भीषण घटनेनंतर संपूर्ण परिसरात प्रचंड तणाव आणि भीतीचे वातावरण आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून हिंदू समाजातील वाढती भीती कमी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. परंतु खरी परिस्थिती यापासून दूर आहे कारण बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांवरील हिंसाचार दिवसेंदिवस वाढत आहे.
भारताची कठोर भूमिका काय असणार?
बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांबाबत भारत सरकारने कठोर भूमिका स्वीकारली असून अल्पसंख्याकांची सुरक्षा आणि त्यांच्या हक्कांचे रक्षण केले पाहिजे, असे म्हटले आहे. तर जम्मू आणि काश्मीर पोलिसांचे माजी डीजी डॉ. एसपी वैद यांनी सांगितले की, बांगलादेशात हिंदूंसोबत जे काही होत आहे ते कधीही मान्य नाही. त्याचा फटका केवळ बांगलादेशच नाही तर भारत आणि इतर देशांवरही पडणार आहे.
त्यामुळे आम्ही जवळपास 75 निवृत्त IAS, IPS, न्यायाधीशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. ज्यामध्ये आम्ही बांगलादेशवर निर्बंध लादण्याबरोबरच कठोर पावले उचलून बांगलादेशातील हिंदूंवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी बांगलादेश सरकारवर दबाव आणण्याचे आवाहन केले आहे.





