\n

सिलहटमध्ये अशी लिहिली गेली विजयाची कहाणी…

\n

पहिला दिवस: सिलहट कसोटीत न्यूझीलंडचा कर्णधार नझमुल हुसैन शांतोने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. महमुदुल हसन जॉयची 86 धावांची खेळी आणि उर्वरित फलंदाजांच्या छोट्या खेळीमुळे बांगलादेशने पहिल्या दिवशी 9 गडी गमावून 310 धावा केल्या.

\n

दुसरा दिवस : बांगलादेशने दिवसाच्या सुरुवातीलाच 10वी विकेट गमावली. बांगलादेशचा पहिला डाव केवळ 310 धावांवर संपला. यानंतर न्यूझीलंडची सुरुवातही विशेष झाली नाही. संघाने ठराविक अंतराने विकेट गमावल्या. केन विल्यमसनने शतक झळकावताना एक टोक सांभाळले पण त्याला दुसऱ्या टोकाकडून फारशी साथ मिळाली नाही. विल्यमसनही शतक झळकावून लगेच पॅव्हेलियनमध्ये परतला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंड संघाने 8 विकेट गमावून 266 धावा केल्या होत्या.

\n

तिसरा दिवस : तिसऱ्या दिवशी टीम सौदी (35) ने किवी संघाला 300 च्या पुढे नेले. न्यूझीलंडने पहिल्या डावात 317 धावा केल्या आणि बांगलादेशवर 7 धावांची आघाडी घेतली. यानंतर किवी गोलंदाजांनी धुमाकूळ घातला आणि बांगलादेशच्या दोन्ही सलामीवीरांना झटपट पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर न्यूझीलंडची खेळावरील पकड मजबूत होत होती, असं वाटत असतानाचा बांगलादेशचा कर्णधार नझमुल हुसेन शांतोने संयमी खेळ करत शतक झळकावले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत बांगलादेशचा संघ 3 गडी गमावून 212 धावा करून सुस्थितीत होता.

\n

चौथा दिवस : बांग्ला फलंदाजांनी हळूहळू डाव पुढे नेत 338 धावा केल्या. अशाप्रकारे न्यूझीलंडला आता विजयासाठी 332 धावांचे लक्ष्य मिळाले होते. या मोठ्या आव्हानापुढे न्यूझीलंड संघानं सपशेल शरणागती पत्कारली. पहिल्या षटकापासूनच विकेट पडण्याचा सिलसिला सुरू झाला आणि दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंडने 7 गडी गमावून केवळ 113 धावा केल्या होत्या.

\n

पाचवा दिवस : डॅरिल मिशेलने 58 धावा करत काही काळ संघर्ष केला. त्याला टीम साऊदीने 34 धावा काढत साथ दिली मात्र ती अपुरी ठरली. बांगलादेशी गोलंदाजांनी पहिल्या सत्रातच न्यूझीलंडच्या शेवटच्या तीन विकेट घेतल्या. न्यूझीलंडने दुसऱ्या डावात 181 धावा केल्या. अशाप्रकारे बांगलादेशी संघाने सिलहट येथील कसोटीत 150 धावांनी विजय मिळवला.

\n

Chess : प्रज्ञानंद-वैशाली जोडीने बुद्धिबळात रचला इतिहास, अशी कामगिरी करणारी ठरली पहिली बहीण-भावाची जोडी…

\n

\n

तैजुल इस्लामने पटकावल्या 10 विकेट…

\n

बांगलादेशचा डावखुरा फिरकीपटू तैजुल इस्लामला या सामन्यासाठी ‘प्लेअर ऑफ द मॅच’ म्हणून निवडण्यात आले. त्याने सामन्याच्या पहिल्या डावात चार तर दुसऱ्या डावात सहा विकेट्स घेतल्या. तैजुलशिवाय मोमिनुल हक आणि नईम हसन यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले. शरीफुल इस्लाम आणि मेहदी हसन मिराज यांनाही प्रत्येकी 2 बळी मिळाले.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"BAN vs NZ 1st Test : कसोटी क्रिकेटमध्ये बांगलादेशचा मोठा विजय, स्टार खेळाडूंनी सजलेल्या न्यूझीलंड संघाचा केला पराभव…","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/12/banss.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/swapnilhajareeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/bangladesh-vs-new-zealand-1st-test-bangladesh-won-by-150-runs#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/12/banss.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/bangladesh-vs-new-zealand-1st-test-bangladesh-won-by-150-runs#webpage","name":"BAN vs NZ 1st Test : कसोटी क्रिकेटमध्ये बांगलादेशचा मोठा विजय, स्टार खेळाडूंनी सजलेल्या न्यूझीलंड संघाचा केला पराभव…","url":"https://www.dainikprabhat.com/bangladesh-vs-new-zealand-1st-test-bangladesh-won-by-150-runs","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/bangladesh-vs-new-zealand-1st-test-bangladesh-won-by-150-runs#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/12/banss.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/bangladesh-vs-new-zealand-1st-test-bangladesh-won-by-150-runs#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/bangladesh-vs-new-zealand-1st-test-bangladesh-won-by-150-runs","name":"BAN vs NZ 1st Test : कसोटी क्रिकेटमध्ये बांगलादेशचा मोठा विजय, स्टार खेळाडूंनी सजलेल्या न्यूझीलंड संघाचा केला पराभव…"}}]}}}

BAN vs NZ 1st Test : कसोटी क्रिकेटमध्ये बांगलादेशचा मोठा विजय, स्टार खेळाडूंनी सजलेल्या न्यूझीलंड संघाचा केला पराभव…