Bangladesh Violence & Cricket : बांगलादेश क्रिकेटची वाटचाल बरबादीकडे..? BCB च्या संचालकांनी दिला राजीनामा, जाणून घ्या कारण…

Bangladesh Violence & Bangladesh Cricket Board : बांगलादेशातील सत्तापालटाच्या स्थितीचा क्रिकेटवरही परिणाम दिसून येत आहे. बांगलादेशात सध्या परिस्थिती चांगली नाही. अशा परिस्थितीत 2024 मध्ये होणारा महिला टी-20 विश्वचषकही दुसऱ्या देशात हलवला जाऊ शकतो, असे मानले जात आहे. दुसरीकडे बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे यामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यातच बांगलादेश क्रिकेटमध्ये राजीनाम्यांची फेरी सुरूच आहे. यादरम्यान बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या क्रिकेट ऑपरेशन्सचे अध्यक्ष जलाल युनूस यांनी तत्काळ प्रभावाने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सध्याच्या मंडळाचा राजीनामा देणारे पहिले संचालक आहेत.
बांगलादेशातील राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर बीसीबीचे संचालक आणि क्रिकेट ऑपरेशन्सचे अध्यक्ष जलाल युनूस यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. यादरम्यान जलाल युनूस यांनी क्रिकेटच्या हितासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले. देशात सरकार बदलल्यानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाची चौकशी सुरू आहे.
🚨 OFFICIAL: Operations chairman Jalal Yunus has resigned from Bangladesh Cricket Board (BCB).#BCB #CricketTwitter pic.twitter.com/FfAv4SeBlv
— ER Saif 🇧🇩 (@ERSaif14) August 19, 2024
आपल्या पदाच्या राजीनाम्याला दुजोरा देताना जलाल युनूस यांनी क्रिकबझला सांगितले की, ‘मी क्रिकेटच्या हितासाठी बोर्डाच्या पदाचा राजीनामा दिला आहे.’ भविष्यात बोर्डात आणखी बदल होण्याची आशाही त्यांनी व्यक्त केली. यापूर्वी बीसीबीचे अध्यक्ष नजमुल हसन यांनीही आपल्या पदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. सरकारला सहकार्य करायचे आहे, असे ते म्हणाले होते.
सरकारी हस्तक्षेप वाढू शकतो
जलाल यांच्या राजीनाम्याचा सर्वाधिक परिणाम बांगलादेशातील क्रिकेट ऑपरेशनवर होणार आहे. या वर्षाच्या अखेरीस बांगलादेशमध्ये महिला टी-20 विश्वचषक होणार आहे. मात्र तेथील परिस्थितीमुळे त्याला दुसऱ्या देशातही हलवले जाऊ शकते. बोर्ड क्रिकेटच्या अध्यक्षांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिल्यास तेथील क्रिकेटमध्ये सरकारी हस्तक्षेप वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बांगलादेशचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर…
बांगलादेशचा पुरुष क्रिकेट संघ सध्या पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे. येथे त्याला एकदिवसीय आणि कसोटी मालिका खेळायची आहे. 21 ऑगस्टपासून कसोटी मालिका सुरू होणार आहे. पहिला सामना 21 ते 25 ऑगस्ट दरम्यान रावळपिंडी येथे होणार आहे. तर दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना रावळपिंडीतच 30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर दरम्यान होणार आहे.





