#BANvAUS 1st T20I : बांगलादेशकडून ऑस्ट्रेलिया पराभूत
Updated On:

ढाका – बांगलादेश संघाने ऐतिहासिक कामगिरी करत बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 23 धावांनी पराभूत केले. या विजयासह बांगलादेशने पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 131 धावा केल्या. बांगलादेशकडून यावेळी सर्वाधिक 36 धावा शकिब अल हसनने केल्या, तर महंमद नइमने 30 धावांची खेळी केली.
बांगलादेशच्या गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाचा संघ 108 धावांवर बाद झाला. टी-20 लढतींच्या इतिहासात बांगलादेशने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला आहे.
नसुम अहमदने 19 धावा देत ऑस्ट्रेलियाचे चार गडी बाद करत विजयात मोलाचा वाटा उचलला.





