पुणे जिल्हा | देवी देवतांचे चित्रे असणारे फटाके विक्रीवर बंदी टाका
Updated On:

भोर, (प्रतिनिधी) – हिंदु देवी देवतांचे चित्रे असणारे फटाके विक्रीवर बंदी यावी तसेच असे फटाके विक्रेत्यांवर कारवाई करावी आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी काढलेल्या तिरंगा रॅली वेळी परतीच्या प्रवासात असताना धर्मांधांनी छत्रपती संभाजीनगर या नावाचे फलकावर काळे फासून छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान केला.
त्याविरोधात देखील कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन सकल हिंदु समाज, भोर यांच्या वतीने भोर येथील अप्पर तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय तसेच भोर पोलीस स्टेशन येथे देण्यात आले.
यावेळी हिंदुत्वनिष्ठ सोमनाथ ढवळे, सुनील खळदकर, राहुल शिंदे, अक्षय पवार, गणेश बांदल, प्रदीप बांदल, अमित शहा, रोहित देशमाने, प्रमोद पाटील, वैभव आवाळे, संजय कुलकर्णी, अमर बुदगुडे, यश पवार, हिंदु जनजागृती समितीचे श्रीकांत बोराटे आणि अन्य धर्माभिमानी उपस्थित होते.




