सचिन तेंडुलकरच्या ऑनलाईन गेमिंगच्या ‘त्या’ जाहिरातीवर तात्काळ बंदी घाला; बच्चू कडूंची सरकारकडे मागणी

Updated On:

मुंबई :  राज्यातील सत्ताधारी शिंदे-फडणवीस आणि पावर सरकारमधीलच एक भाग असणारे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांकडे ऑनलाईन गेमिंगच्या ‘त्या’जाहिरातींवर तात्काळ बंदी घालण्याची मागणी केली आहे.  भारतरत्न सचिन तेंडुलकर यांची ती जाहिरात असून यावर बंदी घालण्याची मागणी त्यांनी सरकारकडे  केली आहे. त्याच बरोबर कडून यांनी सचिन तेंडुलकर यांना देखील या जाहिरातीवर बंदी घालण्याची विनंती केली आहे.

बच्चू कडू यांनी मुख्यमनातरी एकनाथ शिंदे यांच्याकडे या जाहिरातीच्या बंदीची मागणी करण्यासाठी एक पत्र लिहिले आहे. त्यासोबतच त्यांनी आपल्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात त्यांनी सरकारकडे ही मागणी केली आहे. बच्चू कडू यांनी पत्रात, “महाराष्ट्र राज्यात ऑनलाईन जुगाराच्या जाहिराती सुरु असून त्यापैकी एक कंपनी पेटीयम फर्स्ट गेम या जुगाराची जाहिरात भारतरत्न  सचिन तेंडुलकर करीत आहेत.

सचिन तेंडुलकर हे प्रसिध्द क्रिकेटर असून भारतात त्यांचे लहान मुलांपासून ते थोरांपर्यंत चाहते आहेत. त्यामुळे ते करित असलेल्या जाहीरातींचा परिणाम लहान थोर सर्व स्तरापर्यंत होतो व या जुगाराच्या जाहिरातीला महाराष्ट्रातील जनता बळी पडत असून त्यांचे कौटुंबिक आयुष्य उदवस्त देखील होत आहे. अशा प्रकारच्या तक्रारी बऱ्याच जणांकडून माझ्यापर्यंत प्राप्त झाल्या आहेत. त्यात प्रामुख्याने  प्रितेश विलास पवार रा. नालासोपारा ता. वसई यांनी माझ्याकडे प्रत्यक्ष तक्रार केलेली असून त्यांनी यासाठी आझाद मैदानात आंदोलनही केलेले आहे.

पेटीयम फर्स्ट गेम या ऑनलाईन जुगारावर भारतातील आंध्रप्रदेश, आसाम, नागालँड, सिक्कीम, अरुणाचलप्रदेश, मेघालय, ओडीसा, तेलंगणा या आठ राज्यांमध्ये पूर्णतः बंदी घातली •आहे. भारतरत्न सन्मानाने सन्मानीत झालेल्या व्यक्तीने अशा प्रकाराच्या जुगाराची जाहिरात करणे लोकांच्या हिताचे नाही. त्यामुळे श्री. सचिन तेंडुलकर हे भारतरत्न सन्मानित असल्याने त्यांनी भारतातील जनतेचा विचार करून अशा प्रकारच्या जाहिराती करू नये ही आपल्या देशासाठी त्यांची नैतिक जबाबदारी आहे.

तरी महाराष्ट्रातील नव्हेच तर भारताची पुढील पिढी या जुगाराच्या विळख्यातून वाचवायची असेल तर या जाहिरातीवर बंदी घालण्यात यावी आणि लोकांची व त्यांच्या कुटुंबियांची आर्थिक फसवणूक थांबविण्यात यावी, ही विनंती.” असे म्हटले गेले आहे.

आणखी संबंधित बातम्या

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

2026-10-07 21:58:13

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

Devendra Fadnavis : "एमपीएससी आंदोलन हायजॅक, ते पूर्णपणे राजकीय बनले आहे" - मुख्यमंत्री फडणवीस

2026-10-07 20:57:05

Devendra Fadnavis : "एमपीएससी आंदोलन हायजॅक, ते पूर्णपणे राजकीय बनले आहे" - मुख्यमंत्री फडणवीस

Oil tanker attack : काळ्या समुद्रातल्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला; भारताच्या २३ कर्मचाऱ्यांची सुटका

2026-10-07 19:39:08

Oil tanker attack : काळ्या समुद्रातल्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला; भारताच्या २३ कर्मचाऱ्यांची सुटका

Narendra Modi : आपण करूनच दाखवू..! 'विकसित भारत संकल्प सभे'ला संबोधित करताना नरेंद्र मोदींचा नवा नारा

2026-10-07 19:04:11

Narendra Modi : आपण करूनच दाखवू..! 'विकसित भारत संकल्प सभे'ला संबोधित करताना नरेंद्र मोदींचा नवा नारा

Foreignchi Patlin : 'फॉरेनची पाटलीण' मधली जेनिफर सध्या काय करते? फोटो पाहून ओळखणं झालंय कठीण, अभिनय सोडून धरली योग गुरुची साथ...

2026-10-07 18:16:30

Foreignchi Patlin : 'फॉरेनची पाटलीण' मधली जेनिफर सध्या काय करते? फोटो पाहून ओळखणं झालंय कठीण, अभिनय सोडून धरली योग गुरुची साथ...