श्रीलंकेच्या तीन खेळाडूंवरील बंदी मागे
Updated On:

कोलंबो- श्रीलंकेचा क्रिकेटपटू दानुष्का गुणथिलका, कुसल मेंडिस आणि निरोशन डिकवेला यांच्यावर घातलेली बंदी श्रीलंका बोर्डाने मागे घेतली आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये इंग्लंड दौऱ्यात या तिन्ही खेळाडूंनी बायो बबलचे उल्लंघन केले होते.
तेव्हापासून ते संघाबाहेर होते. गुणथिलकाच्या निवृत्तीचे वृत्त आल्यानंतर श्रीलंका बोर्डाने या तिन्ही क्रिकेटपटूंवरील बंदी उठवली. याचा अर्थ मेंडिस, डिकवेला आणि गुणतिलाका हे तिघेही झिम्बाब्वे दौऱ्यासाठी उपलब्ध असतील.
दरम्यान, दानुष्का गुणथिलकाने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने शेवटचा कसोटी सामना 2018 मध्ये खेळला होता. दोन दिवसांपूर्वी श्रीलंकेचा क्रिकेटर भानुका राजपक्षे याने अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.





