समोसा आणि जिलेबीवर ‘या’ राज्यात बंदी ? ; मुख्यमंत्र्यांनी दिले बंदीवर ‘हे’ स्पष्टीकरण

Ban on Samosa-Jalebi । केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व मंत्रालये आणि विभागांना समोसा, कचोरी, पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राईज, शीतपेये, गुलाब जामुन आणि वडा पाव यासारख्या स्नॅक्समध्ये साखर आणि तेलाचे प्रमाण जास्त असल्याचे सांगितले होते. त्यानंतर याविषयीचे बोर्ड लावण्याचे आवाहनकेंद्र सरकारने केले होते . मात्र यावर पश्चिम बंगाल मध्ये सामोसा आणि जिलेबीवर बंदी घालण्यात येणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. मात्र या वृत्तावर आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी समोसा आणि जलेबी सारख्या लोकप्रिय स्नॅक्सवर बंदी घालण्याच्या वृत्तांना फेटाळून लावले आहे. त्यांनी याविषयी बोलताना, त्यांचे सरकार अशा कोणत्याही निर्देशांची अंमलबजावणी करणार नाही.
समोसा जिलेबीवर बंदी घालण्याबाबत ममतांनी काय म्हटले? Ban on Samosa-Jalebi ।
सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी, “काही माध्यमांमध्ये असे वृत्त आले आहे की आरोग्य मंत्रालयाच्या निर्देशानुसार, आतापासून समोसा ,जिलेबी खाऊ शकत नाहीत. ही पश्चिम बंगाल सरकारने जारी केलेली अधिसूचना नाही. आम्ही प्रत्येक बाबतीत हस्तक्षेप करत नाही. आम्ही त्याची अंमलबजावणी करणार नाही. मला वाटते की समोसा आणि जिलेबी इतर राज्यांमध्येही लोकप्रिय आहेत. त्या राज्यांमधील लोकांनाही हे अन्नपदार्थ आवडतात. आपण लोकांच्या खाण्याच्या सवयींमध्ये हस्तक्षेप करू नये.”असे त्यांनी म्हटले आहे.
आरोग्य मंत्रालयाने निर्देश केले जारी Ban on Samosa-Jalebi ।
लठ्ठपणाशी लढण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने लेटरहेड, लिफाफे, नोटपॅड, फोल्डर आणि प्रकाशने यासारख्या सर्व अधिकृत स्टेशनरीवर आरोग्य संदेश छापण्याचे आवाहन केले आहे. मात्र, तृणमूलचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी या सल्ल्याला फतवा म्हणून संबोधले आणि राज्य त्याची अंमलबजावणी करणार नाही अशी घोषणा केली.
घोष म्हणाले, “केंद्र समोसे आणि जलेबींवर लक्ष ठेवून आहे. विविध फतवे जारी केले जात आहेत. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम बंगालमध्ये असे फतवे लागू केले जाणार नाहीत.” त्यांनी सांगितले की, लोकांना या स्वादिष्ट पदार्थांचा आनंद घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे, जर त्यांची गुणवत्ता राखली गेली तर. “कोण काय आणि कसे खातो; बंगालमध्ये कोणताही हस्तक्षेप होणार नाही,” असेदेखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.





