पाकिस्तानात दहशतवाद्यांनी पॅसेंजर ट्रेन केली ‘हायजॅक’, 120 प्रवाशी ओलीस, 6 सैनिक ठार

Pakistan News: पाकिस्तानमध्ये मंगळवारी दहशतवाद्यांनी पॅसेंजर ट्रेन हायजॅक केली आहे. रिपोर्टनुसार, बलुच लिबरेशन आर्मीने (बीएलए) पॅसेंजर ट्रेन हायजॅक केल्याचा दावा केला आहे. बलुच लिबरेशन आर्मीने एका निवेदनात म्हटले आहे की त्यांच्या सैनिकांनी जफर एक्स्प्रेस हायजॅक केली आहे आणि किमान 120 प्रवाशांना ओलीस ठेवले आहे. रिपोर्टनुसार, बीएलएने पाकिस्तानी लष्कराच्या 5 जवानांनाही ठार केले आहे.
पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) ने पाकिस्तानच्या बोलानमध्ये जफर एक्स्प्रेस हायजॅक करून 120 प्रवाशांना ओलीस ठेवल्याची आणि लष्कराच्या सहा जवानांची हत्या करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. दहशतवादी गटाने असा इशारा दिला आहे की त्यांच्या विरोधात कोणतीही लष्करी कारवाई केल्यास सर्व ओलिसांना ठार केले जाईल.
वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार, पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात फुटीरतावादी दहशतवाद्यांनी मंगळवारी सुमारे 400 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या पॅसेंजर ट्रेनवर हल्ला केला, ज्यात ट्रेन चालक जखमी झाला.
दहशतवाद्यांनी एक निवेदन जारी करून दावा केला की त्यांनी ट्रेन ताब्यात घेतली आहे. त्यांनी सांगितले की, सहा लष्करी कर्मचारी ठार झाले आहेत, तर 100 हून अधिक प्रवाशांना ओलीस ठेवण्यात आले आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी रॉयटर्सला सांगितले की, जाफर एक्स्प्रेस पाकिस्तानच्या नैऋत्य बलुचिस्तान प्रांतातील क्वेटा येथून खैबर पख्तुनख्वामधील पेशावरला जात असताना तिच्यावर हल्ला झाला.





