आमचा दसरा मेळावा बघायला बाळासाहेबांचा आत्मा येईल..! – गुलाबराव पाटील
Updated On:

मुंबई – शिवसेनेचा दसरा मेळावा दरवर्षी शिवतीर्थावर होतो. पण यावर्षी शिवसेनेत दोन गट निर्माण झाले आहेत. दोन्ही गटाकडून त्याठिकाणी दसरा मेळावा घेण्याबाबत मुंबई महपालिकेत अर्ज करण्यात आले आहेत. त्यामुळे महापालिका आता कोणाला परवानगी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावरून आता शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी ठाकरेंवर टीकेचा बाण सोडला आहे.
गुलाबराव पाटील यांनी टीका केली की,’आमचा दसरा मेळावा हिंदुत्वाच्या विचारांचा आहे, मात्र, उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा शरद पवार आणि सोनिया गांधींच्या मिक्स विचारांचा होणार आहे. आमचा दसरा मेळावा बघायला बाळासाहेबांचा आत्मा येईल..!’ असही ते म्हणाले आहे.





