मुळशीतील ‘त्या’ खून प्रकरणात मुख्य आरोपीस जामीन

पुणे – मुळशी येथील कुळे गावच्या हद्दीत एका फार्महाउसवर एका व्यक्तीचा रस्सीने गळा आवळून, त्यानंतर कोयत्याने वार करून खून करून पुरावा नष्ट केला होता.
या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या स्वामीनाथ उर्फ उमेश विश्वनाथ बाळेकाई वय ( ३८ रा. कुळे,मुळशी) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.आर कचरे यांनी जामीन मंजुर केला आहे. त्याने ॲड. हर्ष खंडेलवाल , ॲड. आदित्यराजे भोसले यांच्या मार्फत जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.
या प्रकरणात उमेशसह एकूण ३ आरोपी विरुद्ध खून करून पुरावा नष्ट करणे संदर्भात पौड पोलीस स्टेशन येथे नोव्हेंबर २०२० गुन्हा दाखल झाला होता. कोयत्याने वार करून खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह फार्महोऊस येथील शेतात पुरल्याचे एफआयआरमध्ये म्हटले आहे.
हा गुन्हा परिस्थितीजन्य पुराव्यावर आहे. आरोपी विरोधात पुरेसा पुरावा नाही. त्यामुळे त्याला जामीन देण्याची मागणी ॲड. हर्ष खंडेलवाल यांनी केली. त्यानुसार पुराव्यामध्ये छेडछाड न करणे आणि प्रत्येक सुनावणीस हजर राहण्याचा अटीवर हा निकाल दिला.





