Pune | मोक्कानुसार टोळीप्रमुख म्हणून अटक केलेल्याला जामीन

पुणे – मोक्कानुसार टोळीप्रमुख म्हणून अटक केलेल्याला जामीन संघटीत गुन्हेगारी टोळीचा सदस्य असल्याचा कोणताही ठोस पुरावा नाही. त्यामुळे ताडीचे रसायन बाळगल्याप्रकरणात मोक्कानुसार अटक केलेल्या टोळीप्रमुखाला मोक्का न्यायालयाने जामीन मंजुर केला.
या गुन्ह्यात मोक्का लागू होत नाही. त्याने कोणताही गुन्हा केलेला नसून, त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवले आहे. त्याच्यावर यापूर्वी कोणताही गुन्हा दाखल नाही. कोणत्याही टोळीशी त्याचा संबंध असल्याचा पुरावा समोर आलेला नाही. त्यामुळे त्याला जामीन देण्याची मागणी बचाव पक्षातर्फे करण्यात आली. त्यानुसार सत्र न्यायाधीश एस.आर. नावंदर यांनी हा आदेश दिला.
प्रल्हाद ऊर्फ परेश भंडारी असे जामीन झालेल्याचे नाव आहे. त्याने ॲड. सुरेश. व्ही. जाधव, ॲड. मतीन शेख आणि ॲड. मनिषा खावडे यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता.
24 ऑगस्ट 2021 रोजी लोणी काळभोर येथील कदमवाक वस्ती येथे ताडी बनविण्याचे 200 लीटर रसायन जप्त केले होते. त्यानुसार लोणी काळभोर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये आरोपींना मोक्का लावण्यात आला होता.





