तमन्ना भाटियाने भर गर्दीत केले विजयला किस

मुंबई – नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच बॉलीवूडला नवे जोडपे मिळाल्याचे दिसते. बी-टाऊनची सुंदर अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांच्या डेटींगची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. नवीन वर्षाच्या पार्टीत तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा रोमँटिक पद्धतीने एकमेकांच्या जवळ जाताना दिसले.
तमन्ना भाटियाने गोव्यात तिच्या खास मित्रांसोबत नवीन वर्ष साजरे केले. तमन्नाच्या नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये, तमन्ना आणि विजय वर्मा आधी एकमेकांना मिठी मारतात, नंतर एकमेकांच्या मिठीत हरवून किस घेताना दिसत आहेत. व्हिडिओ पाहताच तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि हे जोडपे रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा जोरात सुरू झाली.
तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा याआधीही त्यांच्या डेटींगमुळे चर्चेत आले आहेत. आता नवीन वर्षाच्या पार्टीत दोघांना किस करताना पाहून ते रिलेशनशिपमध्ये असल्याचं चाहत्यांना वाटतंय. त्यामुळे दोघांनी नवीन वर्ष एकत्र साजरे केले.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा स्पष्टपणे दिसत नाहीत कारण हा व्हिडीओ दुरून शूट करण्यात आला आहे. पण दोघांची झलक पाहायला मिळत आहे, जिथे दोघे मिठी मारताना आणि किस करताना दिसत आहेत.
विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया यांनी अद्याप त्यांच्या रिलेशनशिपच्या बातम्यांवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. आता दोघेही रिलेशनशिपमध्ये आहेत की नाही हे तेच सांगू शकतात. त्यांच्या नात्याची बातमी समोर आल्यानंतर चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत.
तमन्ना भाटियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती बाहुबली चित्रपटासाठी ओळखली जाते. हिंदी चित्रपटसृष्टीसोबतच तमन्ना तामिळ आणि तेलगू चित्रपटसृष्टीतही सक्रिय आहे. तमन्ना आता नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत बोले चुडियामध्ये दिसणार आहे.





