बांगलादेश हिंसाचारावर धीरेंद्र शास्त्रींचे मोठे वक्तव्य ; म्हणाले,”त्याठिकाणची परिस्थिती…”

Bageshwar Dham Sarkar । बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी बांगलादेशातील सध्याच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी त्याठिकाणच्या लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. धीरेंद्र शास्त्री यांनी जारी केलेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी, “ते सध्या न्यूझीलंडमध्ये आहे. बांगलादेशातील परिस्थिती त्यांना प्रसारमाध्यमांद्वारे कळली. त्याठिकाणची परिस्थिती भयानक आहे. मोठ्या प्रमाणात गडबड आणि दगडफेक होत आहे. बांगलादेशची राजधानी ढाकायामध्ये तीन ते चार लाख लोकांनी हिंसाचाराचा अवलंब केला आहे. यामुळे खूप वेदना होत असल्याचे त्यांनी सांगितले.
पूज्य बागेश्वर धाम सरकार का बांग्लादेश प्रकरण पर समस्त सनातनी समाज को “संदेश” | Bageshwar Dham Sarkar #bageshwardhamsarkar #bageshwardham pic.twitter.com/F59L4UtZVE
— Bageshwar Dham Sarkar (Official) (@bageshwardham) August 6, 2024
त्यांनी जागतिक शांततेची कामना केली आहे. बांगलादेशात लवकरच शांतता प्रस्थापित व्हावी. ते म्हणाले की, प्रसारमाध्यमांमध्ये पाहिल्याप्रमाणे हिंदू बांधव संकटात आहेत, मंदिरांची तोडफोड केली जातीय.
हिंसाचारात अनेकांचे बळी Bageshwar Dham Sarkar ।
बांगलादेशमध्ये हिंसाचाराचे वातावरण आहे. याठिकाणी हिंसाचारात आतापर्यंत १२५ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांन आपल्या पदाचा राजीनामा देऊन देश सोडला. हिंसाचारात आपला देश सोडून गेलेल्या शेख हसीना सध्या भारताच्या हिंडन एअरबेसवर आहेत. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना येत्या ४८ तासांत भारत सोडणार आहेत. ती युरोपला जाऊ शकते.
हिंदूंवर हल्ले होणे धोकादायक – रामदेव बाबा Bageshwar Dham Sarkar ।
बांगलादेशात सुरू असलेल्या हिंसाचारात मंदिरे आणि हिंदूंना लक्ष्य केले जात असल्याच्या बातम्या येत आहेत. बांगलादेशात अनेक मंदिरांची तोडफोड करण्यात आली आहे. दहशतवादी हिंदूबहुल भागांना लक्ष्य करत आहेत. बाबा रामदेव यांनीही बांगलादेशातील परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, हिंदूंवर ज्या प्रकारे हल्ले होत आहेत ते अत्यंत धोकादायक आहे. हे हल्ले कोणत्याही परिस्थितीत थांबवायचे आहेत.





