उत्तराखंडमधील बद्रीनाथ महामार्गावर भीषण अपघात ; 10 जणांचा मृत्यू तर 7 जण गंभीर जखमी

Badrinath Highway Accident । उत्तराखंडमधील बद्रीनाथ महामार्गावर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येतीय. प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर वाहनाचा ताबा सुटून अलकनंदा नदीत पडला. या अपघातात 10 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर सात जण जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. बेपत्ता लोकांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात Badrinath Highway Accident ।
बद्रीनाथ महामार्गावरील रेंटोलीजवळ हा अपघात झाला असून, तपोन ट्रॅव्हलरचे अचानक नियंत्रण सुटले आणि तो उलटून अलकनंदा नदीत पडला. या घटनेनंतर त्याठिकाणी गोंधळ उडाला. लोक मदतीसाठी ओरडू लागले. आवाज ऐकून मदतीसाठी मोठ्या संख्येने लोक जमा झाले. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रॅव्हलरमध्ये सुमारे सतरा प्रवासी होते. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. नदीच्या जोरदार प्रवाहामुळे बचावकार्यात अडचणी येत आहेत.
जनपद रुद्रप्रयाग में टेम्पो ट्रैवलर के दुर्घटनाग्रस्त होने का अत्यंत पीड़ादायक समाचार प्राप्त हुआ। स्थानीय प्रशासन व SDRF की टीमें राहत एवं बचाव कार्यों में जुटी हुई है। घायलों को नज़दीकी चिकित्सा केंद्र पर उपचार हेतु भेज दिया गया है। ज़िलाधिकारी को घटना की जाँच के आदेश दे दिए…
— Pushkar Singh Dhami (@pushkardhami) June 15, 2024
एसपी डॉ.विशाखा अशोक भदाणे, यांनी या अपघाताला दुजोरा दिला आहे. घटनेची माहिती मिळताच एसडीआरएफची टीमही घटनास्थळी रवाना झाली. एमआरएफ आणि एनडीआरपीचे पथक बचाव कार्यात गुंतले आहेत. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही या अपघातावर शोक व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश Badrinath Highway Accident ।
सीएम पुष्कर सिंह धामी यांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अपघातविषयी दुःख व्यक्त केले आहे. याविषयी बोलताना त्यांनी ‘रुद्रप्रयाग जिल्ह्यात टेम्पो ट्रॅव्हलरच्या अपघाताची अत्यंत वेदनादायक बातमी मिळाली. स्थानिक प्रशासन आणि एसडीआरएफचे पथक मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या वैद्यकीय केंद्रात पाठवण्यात आले आहे. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. दिवंगतांच्या आत्म्याला शांती मिळो आणि शोकाकुल कुटुंबीयांना हे अपार दुःख सहन करण्याची शक्ती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी बाबा केदार यांना प्रार्थना करतो.” असे म्हटले आहे.





