Badlapur School : बदलापूरच्या घटनेची थेट दिल्लीत दखल; राष्ट्रीय बाल हक्क आयोगाचं पथक महाराष्ट्रात येणार

Badlapur School Girl Rape Case | बदलापूरमध्ये एका नामांकित शाळेतील दोन चिमुकल्यांवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. मोठ्या प्रमाणात नागरिक रस्त्यावर उतरले आहे. या घटनेतील दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली जाते आहे.
याप्रकरणाच्या चौकशीसाठी आता सरकारने विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यलयाने एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.
मात्र, आता मुंबईतील या घटनेचेथेट दिल्लीत पडसाद उमटताना दिसत आहे. या प्रकरणाची राष्ट्रीय बालक आयोगाने दखल घेतली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी राष्ट्रीय बाल हक्क आयोगाकडून एक पथक बदलापूरला पाठवण्यात येणार आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल, असे राष्ट्रीय बालहक्क आयोगाने सांगितले आहे.
महाराष्ट्र के ठाणे जिले के बदलापुर में स्कूल में चार साल की बच्ची के साथ दुष्कर्म का बेहद दुखद समाचार प्राप्त हुआ है, प्रकरण में स्थानीय पुलिस द्वारा पीड़ित के अभिभावकों को FIR दर्ज करने हेतु 12 घंटों तक इंतजार करने का मामला भी सामने आया है। @NCPCR_ ने घटना का संज्ञान लेते हुए…
— प्रियंक कानूनगो Priyank Kanoongo (@KanoongoPriyank) August 20, 2024
केंद्र सरकारने निर्मित केलेल्या राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. यासाठी आयोगाकडून एक तपास पथक बदलापूर येथे पाठवण्यात येणार आहे. हे पथक या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करेल. तसेच पोलिसांनी पीडितेच्या पालकांना तक्रार नोंदवण्यासाठी 12 तास थांबवले, ही धक्कादायक बाब आहे.
याप्रकरणी राज्य शासनाकडून संबंधित पोलीस अधिकाऱ्याची बदली करण्यात आली आहे, अशी माहिती माहिती बालहक्क आयोगाचे अध्यक्ष प्रियांक कानगो यांनी दिली आहे. तसेच राष्ट्रीय बाल हक्क आयोगाकडून पाठवण्यात येणाऱ्या या समितीवर माझेही लक्ष असेल.
तसेच याप्रकरणी सहभागी असलेल्या सर्व दोषी पोलिस अधिकाऱ्यांना शिक्षा होईल. त्यासोबतच याप्रकरणाची सखोल चौकशी आम्ही देखील करणार असल्याची माहिती बालहक्क आयोगाचे अध्यक्ष प्रियांक कानगो यांनी दिली आहे.
चौकशीसाठी SIT गठीत करण्याचे देवेंद्र फडणवीसांचे आदेश
बदलापूर येथील घटना दुर्दैवी आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक गठीत करण्याचे निर्देश दिले आहेत,
बदलापूर येथील दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ IPS अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली SIT गठित करण्याचे आदेश दिले आहेत.
दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यासाठी, हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी…— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) August 20, 2024
देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ IPS अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली SIT गठित करण्याचे आदेश दिले आहेत.
बदलापूर येथील दुर्दैवी घटनेत 2 तासात आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात संस्थेचीसुद्धा चौकशी करण्यास पोलिसांना सांगण्यात आले आहे. याप्रकरणातील दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही ठाणे पोलिस आयुक्तांना दिल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे.





