बड़े लोगों की बड़ी बातें.! सोनम कपूरच्या ‘हेयर क्लिप’ची किंमत ऐकून उडतील होश, आकडा एकदा पाहाच

Sonam Kapoor : बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर अभिनयासह तिच्या फॅशनमुळे देखील चर्चेत असते. मात्र अनेकदा तिला तिच्या फॅशनमुळे ट्रोल केले जाते. या अभिनेत्रीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तिने लावलेली हेअरक्लिची किंमत एखाद्या स्मार्टफोनच्या किंमतीएवढी आहे.
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, यामुळे अभिनेत्रीला नेटकऱ्यांनी ट्रोल देखील केल्याचं दिसून येत आहे. अभिनेत्री फॅशन, लक्झरिअस लाईफस्टाईल आणि तिच्या ब्रँडेड वस्तूंसाठी ओळखली जाते. तिच्या प्रत्येक लूकमध्ये एक लक्झरी टच असतो आणि ती नेहमीच आंतरराष्ट्रीय ब्रँडचे कस्टमाइज्ड आउटफिट्स दिसून येत.
दरम्यान, या व्हिडिओत अभिनेत्रीने डायर (Dior) ची हेअरक्लिप केसांना लावलेली दिसत आहे. साधारणपणे, आपण पाहतो की केसांच्या क्लिपची किंमत 10 रुपयांपासून सुरू होते. जर एखाद्या ब्रँड जरी आपण क्लिप घेतली तरी त्याची किंमत सुमारे 100 ते 150 रुपये असते.
View this post on Instagram
पण सोनम कपूरच्या हेअरक्लिपची किंमत सुमारे 35.000 ते 40.000 रुपये असल्याचं दिसून आलं आहे. या किंमतीत एखादा दमदार स्मार्टफोन देखील येऊ शकतो. दरम्यान, अभिनेत्रीच्या या व्हिडिओ नेटकरी अनेक कमेंट करत असून तिला ट्रोल करत आहेत.
सोनमच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर, 2018 मध्ये ती ‘जोया फॅक्टर’ या चित्रपटात दिसली होती. मात्र हा चित्रपट फ्लॉप ठरला होता. याशिवाय जिओ सिनेमावर तिचा’ ब्लाइंड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
सोनमने 2022 मध्ये एका मुलाला जन्म दिला आणि तेव्हापासून ती मातृत्वाची जबाबदारी पार पाडत आहे. यानंतर ती फारशी कोणत्याही चित्रपटात दिसली नाही.





