‘ॲनिमल’मुळे समाजावर वाईट परिणाम? रणबीर कपूरने केले स्पष्ट

Ranbir Kapoor | अभिनेता रणबीर कपूरचा ‘अॅनिमल’ चित्रपट सुपरहिट ठरला. मात्र या चित्रपटावर अनेकांकडून टीकाही करण्यात आली. यावर त्याने आपली प्रतिक्रिया दिली आहे. गोवा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये रणबीर सहभागी झाला होता. त्यादरम्यान त्याने अनेक विषयांवर चर्चा केली. ॲनिमलचा समाजावर वाईट परिणाम झाल्याचं मत त्याने व्यक्त केले.
‘इफ्फी’ सोहळ्यात रणबीरला अॅनिमल’ सारख्या सिनेमांमुळे समाजावर वाईट परिणाम होतोय का? असा सवाल करण्यात आला. त्यावर तो म्हणाला, “मी तुमच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे. एक अभिनेता म्हणून आमचं हे कर्तव्यच आहे की समाजावर सकारात्मक परिणाम करणारे चित्रपट करावे. पण हेही तितकंच सत्य आहे की मी एक अभिनेता आहे आणि मला विविध भूमिका करायला मिळाव्या हे माझ्यासाठी गरजेचे आहे. पण तुम्ही म्हणत आहात तेही सत्य आहे. आम्ही ज्या प्रकारचे चित्रपट बनवतो त्याबद्दल आपण अधिक जबाबदार असले पाहिजे.” Ranbir Kapoor |
दरम्यान, रणबीर कपूरने ‘अॅनिमल’ चित्रपटात उत्तम काम केले. मात्र यातील काही दृश्य आणि संवादावर अनेकांकडून टीका करण्यात आली होती. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित ॲनिमल या ॲक्शन ड्रामा चित्रपटात रणबीर कपूर, अनिल कपूर, बॉबी देओल, रश्मिका मंदान्ना आणि तृप्ती दिमरी यांच्या भूमिका आहेत. चित्रपटाने जगभरात 917 कोटींचा गल्ला केला.
रणबीर लवकरच ‘रामायण’ चित्रपटात दिसणार आहे. त्याच्यासोबत साई पल्लवी मुख्यभूमिकेत असणार आहे. याशिवाय तो संजय लीला भन्साळी यांच्या आगामी ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटात दिसणार आहे. Ranbir Kapoor |





