बच्चू कडू उभारणार शेतकरी आघाडी; मनोज जरांगे यांनाही सोबत येण्याचे आमंत्रण

Bachchu Kadu | Manoj Jarange – प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी मोठी घोषणा केली आहे. विधानसभा निवडणुकीत तिसरी आघाडी नाही, तर शेतकऱ्यांची आघाडी असणार, अशी घोषणा बच्चू कडू यांनी केली आहे.
यामुळेच येत्या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीचे टेन्शन वाढण्याची चिन्ह आहेत. येत्या ९ ऑगस्टला सभेत भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहितीही बच्चू कडू यांनी दिली आहे.
त्यासोबत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनाही बच्चू कडू यांनी शेतकरी आघाडीत येण्यासाठी खुले आमंत्रण दिले आहे. जरांगेंना शेतकरी आघाडीत यायचे असेल तर त्याचं स्वागत आहे, असे वक्तव्य त्यांनी कले आहे.
बच्चू कडू म्हणाले, येत्या विधानसभा निवडणुकीत आमची तिसरी आघाडी नाही, तर शेतकऱ्यांची आघाडी असेल. ९ ऑगस्टला छत्रपती संभाजीनगर येथे आम्ही सभा ठेवली आहे. त्यात आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू.
तसेच मनोज जरांगे यांना शेतकरी आघाडीत यायचे असेल, तर त्याचं स्वागत आहे. त्याचप्रमाणे आरक्षण आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सारखेच असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले आहे.





