Bacchu Kadu : शेतकऱ्यांसाठी बच्चू कडू रस्त्यावर ; आज रांजणगावात जाहीर सभा
Updated On:

प्रभात वृत्तसेवा
रांजणगाव गणपती – माजी मंत्री व प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू हे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी आज, दि. १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता रांजणगाव गणपती येथे जाहीर सभा घेणार आहेत. प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अॅड. राहुल सुरेश वाळके यांनी ही माहिती दिली.या सभेत शेतकऱ्यांच्या विविध मागण्या, कृषी कर्जमाफी, वीजदरातील वाढ आणि शेतमालाच्या हमीभावाबाबत चर्चा होणार आहे. सभेला मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित राहतील, अशी अपेक्षा आहे. या सभेच्या तयारीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी जोमाने तयारी सुरू केली असून, सभास्थळी आवश्यक व्यवस्था करण्यात येत आहेत.





