“…पण लाचारी आमच्यात नाही” ; काँग्रेस-भाजपवर हल्लाबोल करत बच्चू कडू स्पष्टच बोलले

Bacchu Kadu । महायुतीच्या पहिल्या टर्ममध्ये सरकारसोबत असणारे आणि दुसऱ्या म्हणजेच सध्याच्या कार्यकाळात विरोधी असणारे प्रहार पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी काँग्रेस आणि भाजपवर सडकून टीका केली आहे. त्यांनी आपल्या आमदारकीचा उल्लेख करत आपण शेतकऱ्यांसोबतच कायम असल्याचा उल्लेख केला.
बच्चू कडू अमरावती जिल्ह्यातील पळसखेड याठिकाणी शिवजयंती निमित्तच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी,”लाचारी स्वीकारली असती तर कोणत्याही पक्षाचा पाठिंबा घेऊन आमदार होता आलं असत, पण मी शेतकऱ्यांसाठी बोलत राहणार. अजून पडलो तरी त्याची परवा नाही,” असे वक्तव्य त्यांनी केले.
मी कधीही लाचारी स्विकारली नाही Bacchu Kadu ।
पुढे त्यांनी यावेळी बोलताना,”मी हे शेतकरी म्हणून बोलत आहे. त्याचा कोणाला राग आला तरी चालेल. पण बच्चू कडू याची पर्वा करत नाही. तशीच ही लाचारी नाही. मी कधीही लाचारी स्विकारली नाही, तसं केलं असतं तर कोणाचा पाठिंबा घेऊन मला आमदार होता आलं. असतं पण ती लाचारी आमच्यात नाही. असे वक्तव्यही बच्चू कडू यांनी केला आहे.
शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून काँग्रेस- भाजपवरही हल्लाबोल Bacchu Kadu ।
छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशातली वतनदारी बंद केली आणि शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावाल तर कापले जाल असं म्हणणारा राजा आता कोणत्याच पक्षात दिसत नाही. 50% नफा धरून आम्ही शेतमालाला भाव देऊ असं भाजपने म्हटलं होतं आणि काँग्रेसने स्वामीनाथन आयोग लागू करू असं म्हटलं होतं. मात्र काँग्रेसने सुद्धा ते लागू केलं नाही. पार्टी कोणतीही असली तरी ते शेतकऱ्यांच्या हितासाठी राहत नाही, हे 75 वर्षात आपण पाहिलं. मी हे शेतकरी म्हणून बोलत आहे. त्याचा राग आला तरी चालेल, बच्चू कडू याची पर्वा करत नसल्याचे ही बच्चू कडू म्हणाले.

