बच्चू कडूंची मोठी घोषणा ! येत्या विधानसभेत शेतकऱ्यांची आघाडी ; मनोज जरांगेंनाही दिलं निमंत्रण

Bacchu Kadu । लोकसभेप्रमाणे राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात पुन्हा एकदा थेट स्पर्धा होणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच पक्षांचे टेन्शन वाढण्याची चिन्ह आहेत. त्यातच प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी नवीन घोषणा केली आहे. विधानसभा निवडणुकीत तिसरी आघाडी नाही, तर शेतकऱ्यांची आघाडी असणार, अशी मोठी घोषणा केली आहे.
येत्या 9 ऑगस्टला सभेत भूमिका स्पष्ट करणार Bacchu Kadu ।
सध्या सत्ताधारी शिंदेंसोबत असलेल्या बच्चू कडू यांनी वेगळ्या आघाडीची घोषणा केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यासोबतच येत्या 9 ऑगस्टला सभेत भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहितीही यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी दिली आहे. त्यासोबत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनाही बच्चू कडू यांनी शेतकरी आघाडीत येण्यासाठी खुलं आमंत्रण दिलं आहे. जरांगेंना शेतकरी आघाडीत यायचं असेल तर त्याचं स्वागत आहे, असे वक्तव्य बच्चू कडू यांनी केलंय.
…तर शेतकऱ्यांची आघाडी असेल Bacchu Kadu ।
प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी बोलताना सांगितलं की, “येत्या विधानसभा निवडणुकीत आमची तिसरी आघाडी नाही, तर शेतकऱ्यांची आघाडी असेल. 9 ऑगस्टला संभाजी नगर येथे आम्ही सभा ठेवली आहे. त्यात आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू.” तसेच, पुढे बोलताना बच्चू कडू म्हणाले की, “मनोज जरांगे यांना शेतकरी आघाडीत यायचं असेल, तर त्याचं स्वागत आहे.” त्याचप्रमाणे, आरक्षण आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सारखेच असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं आहे.





