Baby Born In Plane : विमानात जन्मलेल्या बाळाचे नागरिकत्व कुठले असते? नियम काय सांगतो पाहा….

Baby Born | Plane : विमानाने प्रवास करणे अत्यंत सोयीस्कर असते. वेळेची बचत होत आणि आपला प्रवास देखील आरामदायी होतो. पण विमानातून प्रवास करताना फ्लाईटमध्येच बाळाला जन्म दिला तर त्याच्या नागरिकत्वाचे काय होते हे तुम्हाला माहित आहे का?
समजा तुम्ही भारतातून अमेरिकेला हवाई प्रवास करत आहात आणि प्रवासादरम्यान तुम्ही एका बाळाला जन्म दिला. अशा स्थितीत ते बाळ भारतीय नागरिक आहे की अमेरिकेचे? यावरच आज आपण बोलणार आहोत, आणि नियम काय आहेत हे देखील पाहुयात….
बाळाला मिळते जागतिक नागरिकत्व?
सर्वप्रथम गरोदरपणाच्या शेवटच्या दिवसांमध्ये महिलांना विमान प्रवास टाळण्यास सांगितले जाते. 36 आठवड्यांनंतर महिलेला विमानाने प्रवास करण्याचीही परवानगी नाही. असे असले तरी डिलिव्हरीच्या आधी विमान प्रवासात स्त्री असल्यास बाळाला पालकांचे राष्ट्रीयत्व दिले जाण्याची 99% शक्यता असते. बाळाला जागतिक नागरिकत्व दिल्याचे कुठेही ऐकू येत नाही.
कोणते नागरिकत्व मिळू शकते?
उदाहरणार्थ, जर बांगलादेशहून अमेरिकेला जाणारे विमान भारतीय सीमेवरून गेले असेल आणि या विमानात एका महिलेने मुलाला जन्म दिला असेल तर मुलाचे जन्मस्थान भारत मानले जाईल आणि त्याला येथे नागरिकत्व मिळू शकेल. त्याला त्याच्या पालकांचे राष्ट्रीयत्व आणि भारताचे नागरिकत्व दोन्ही मिळू शकते. पण भारतात दोन देशांच्या नागरिकत्वावर बंदी आहे.
गर्भवती महिलांसाठी हवाई प्रवासाचे नियम :
जगभरातील विविध एअरलाइन्सद्वारे किंवा अगदी देशांतर्गत गर्भवती महिला कधी आणि किती काळ उड्डाण करू शकतात याबद्दल वेगवेगळे नियम आणि कायदे आहेत. वैद्यकीय स्थिती असलेल्या गर्भवती महिलांसाठी हवाई प्रवासाची शिफारस केलेली नाही. तसेच गर्भवती महिलांच्या विमान प्रवासासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र अनिवार्य आहे, जे 7 दिवसांपेक्षा जास्त जुने नसावे.
अशी घटना कधी घडली, पाहा…
अमेरिकेत काही वर्षांपूर्वी अशी एक घटना घडली होती. विमानात जन्मलेल्या एका मुलाला अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले, कारण विमान अमेरिकेच्या सीमा ओलांडताना त्या मुलाचा जन्म झाला. अशा परिस्थितीत त्या मुलाला नंतर डबल नागरिकत्व (अमेरिकन आणि नेदरलँड्स) मिळाले कारण त्याचे पालक नेदरलँड्सचे होते.
तिकीट खरेदी करताना विमा घ्यावा लागेल का?
रेल्वे तिकीट बुक करताना, विमा बॉक्सवर देखील क्लिक करतो. या विम्यासाठी आमच्याकडून काही पैसे घेतले जातात. आता विमानाचे तिकीट काढतानाही हे करावे लागेल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तर याचे उत्तर आहे, नाही. वास्तविक, विमानाच्या बाबतीत, संपूर्ण विमानाचा विमा उतरवला जातो. अशा परिस्थितीत जेव्हा विमान अपघात होतो तेव्हा विमा कंपनी विमानात बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला निश्चित नुकसानभरपाई देते.





