बहुचर्चित ‘बाबू’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज; पाहायला मिळणार आगरी-कोळी भाषेचा तडका

मुंबई : ‘बाबू नाय, बाबू शेठ म्हणत’, अस्सल कोळी भाषेचा जलवा दाखवणारा स्टायलिश ‘बाबू’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या चित्रपटाचा ट्रेलर लॉंच करण्यात आला आहे. येत्या 2 ऑगस्टला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये आगरी-कोळी भाषेचा तडका पाहायला मिळणार आहे. तसेच ‘बाबू’ची भूमिका साकारणाऱ्या अंकित मोहनचा एक वेगळाच स्वॅग पाहायला मिळणार आहे.
प्रदर्शित झालेला ट्रेलर पाहून प्रेक्षकांची ‘बाबू’विषयीची उत्सुकता अधिकच वाढली आहे. यात ‘बाबू’च्या आयुष्यातील प्रेम, शत्रु आणि सूडभावना, जबरदस्त ॲक्शन दिसत आहे. त्याच्या आयुष्यात नेमके काय होते, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना हा चित्रपट पाहावा लागेल.
‘बाबू’ चित्रपटाविषयी
श्री समर्थ कृपा प्रोडक्शन प्रस्तुत ‘बाबू’ या चित्रपटाची निर्मिती सुनीता बाबू भोईर यांनी केली आहे. तर या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा मयूर मधुकर शिंदेने सांभाळली आहे. अंकित मोहन, नेहा महाजन, रुचिरा जाधव, स्मिता तांबे , संजय खापरे, श्रीकांत यादव यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.





