बाबरी विध्वंस ! अडवाणींचा ‘तो’ व्हिडीओ शेअर करत संजय राऊतांचं फडणवीसांना चोख प्रत्यु्त्तर

मुंबई – बाबरी ढाचा पाडण्यात शिवसैनिकांचा सहभाग नव्हता असे एक नवीन वक्तव्य भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्याला शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज एक सज्जड व्हिडीओ पुरावा देऊन फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले आहे.
संजय राऊत यांनी 29 डिसेंबर 2000 रोजीचा लालकृष्ण आडवाणी यांच्या मुलाखतीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच त्यांनी त्यावेळची काही वृत्तपत्रीय कात्रणेही जोडली आहेत. त्या अनुषंगाने आता बोला असे आवाहन राऊत यांनी फडणवीस यांना दिले आहे.
सदर मुलाखतीत आडवाणी यांनी म्हटले आहे की, बाबरी मशिद पाडणे ही खूप मोठी चूक होती. हा प्रकार घडत असताना मी पहिल्यांदा उमा भारती यांना तिकडे पाठवले होते. त्यांना खाली उतरावा असा निरोप मी त्यांना दिला होता. जेव्हा त्या परतल्या त्यावेळी त्या म्हणाल्या की मशिदीवर काही लोक चढले आहेत ते मराठीत बोलत आहेत. ते माझे ऐकत नाहीत असे त्या म्हणाल्या.
बाबरी कोणी पाडली?
ऐका…. pic.twitter.com/cnBTWLLiMI— Sanjay Raut (@rautsanjay61) May 2, 2022
त्यानंतर मी प्रमोद महाजनांना तिकडे पाठवले. ते तिकडे गेले पण तेही हताश होऊन परत आले. हे मराठी लोक म्हणजेच शिवसैनिक होते असे सिद्ध करण्याचा प्रयत्न या व्हिडीओद्वारे राऊत यांनी केला आहे.





