‘मिर्झापूर : द फिल्म’मध्ये होणार बबलू पंडितची एन्ट्री ?

Mirzapur: The Film | ‘मिर्झापूर’ या क्राइम थ्रीलर वेब सीरिजचे आतापर्यंत तीन सीझन रिलीज झाले आहे. या तिन्हीही सीझनला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. आता या सुपरहिट सीरिजचा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. ‘मिर्झापूर द फिल्म’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला. जो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
या चित्रपटात मुन्ना भैय्याचं कमबॅक दाखवलं जाणार आहे. तसेच आता ‘मिर्झापूर’ चित्रपटात गुड्डू भैय्याचा डावा हात बबलू पंडित पाहायला मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे. अभिनेता विक्रांत मेस्सीने साकारलेला बबलू पंडित खूप मेहनत करून आयएएस अधिकारी बनून पुन्हा ‘मिर्झापूर’ चित्रपटात एन्ट्री करू शकतो, असा अंदाज आहे. तर विजय वर्मा आणि माधुरी यादव उर्फ ईशा तलवारसह अनेक व्यक्तिरेखा ‘मिर्झापूर’ चित्रपटातून हटवलं जाणार असल्याचं म्हटलं जात आहे.
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वीच एमजीए स्टुडिओ आणि एक्सेल मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रोडक्शनने ‘मिर्झापूर’ चित्रपटाची घोषणा केली. २०२६ला ‘मिर्झापूर’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, या चित्रपटात पंकज त्रिपाठी, अली फजल, मुन्ना त्रिपाठी, अभिषेक बनर्जीसह इतर कलाकार देखील पाहायला मिळणार आहेत.
हेही वाचा:





