पिंपरी | बबलू 11 भाताण संघ ठरला भावी आमदार चषकाचा मानकरी

खालापूर, (वार्ताहर) – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या नावाने भावी आमदार क्रिकेट स्पर्धेचे आयोजन 7 मार्च ते 10 मार्च यादरम्यान करण्यात आले होते. या स्पर्धेत खालापूर व कर्जत मधील 32 संघांनी सहभाग घेतला होता. बबलू 11 भाताण संघ बबलू 11 भाताण संघ भावी आमदार चषकाचा मानकरी ठरला.
या स्पर्धेच्यावेळी उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, एकनाथ पिंगळे, उत्तम कोळंबे, हुसेन भाई खान, प्रशांत खांडेकर, भरत देशमुख, प्रफुल्ल विचारे, तुळशीराम पाटील, संभाजी पाटील, अविनाश पालाडे, मनीष पालांडे, प्रणाल लाले, मयूर ठोंबरे, स्वप्नील सुर्वे, कल्पेश पाटील, गणेश मोरे, सागर पिंगळे, तानाजी दिसले, कमलाकर बोराडे, संतोष देशमुख, योगेश पालांडे, शरद हडप, उत्तम पालांडे, अखिल दुस्ते आदी उपस्थित होते.
ग्रामीण भागातील क्रिकेट खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी अक्षय दिसले यांच्या पुढाकाराने जय भैरवनाथ क्रिकेट संघ केलवली व शिवसेना-युवासेना शाखा केलवली यांच्यावतीने नितीन सावंत यांच्या नावाने मानकीवली येथील मैदानात भावी आमदार चार दिवसीय क्रिकेट स्पर्धा पार पडली.
अटीतटीच्या लढतीत भावी आमदार चषकावर भाताण बबलू 11 संघाने नाव कोरले. द्वितीय क्रमांक नावंढे संघाने, तृतीय क्रमांक चिंचवली संघाने तर चतुर्थ क्रमांक आत्करगाव संघाने मिळविला. विजयी संघांना रोख रक्कम व आकर्षक ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले. मालिकावीर खेळाडू भाताण संघाच्या जयेश भोईर यांना ट्रॉफी आणि कुलर देऊन सन्मानित केले.





