Pune | बाबासाहेब पुरंदरे स्मृती व्याख्यानमाला दि. ७ डिसेंबरपासून

पुणे : कौशिक आश्रम आणि अक्षय सेवा संशोधन प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या कै. बाबासाहेब पुरंदरे स्मृती व्याख्यानमालेत यंदा माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी आणि संत साहित्याचे व्यासंगी, निरूपणकार विवेक घळसासी यांची व्याख्याने होणार आहेत.
न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड येथे ही व्याख्यानमाला होणार असून दोन्ही दिवशी सायंकाळी सात वाजता कार्यक्रमाचा प्रारंभ होईल. व्याख्यानमाला निःशुल्क आहे. व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी ७ डिसेंबर रोजी अविनाश धर्माधिकारी यांचे “भारत तोडो षडयंत्र’ या विषयावर व्याख्यान होईल. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
दि. ८ डिसेंबर रोजी “भारताच्या वैभवाचा आधार – माझं घर माझा परिवार’ या विषयावर विवेक घळसासी यांचे व्याख्यान होईल. अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि कायदेतज्ज्ञ डी. डी. शहा यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असेल, असे संस्थेचे अध्यक्ष सुनील राऊत यांनी सांगितले.





