Babar Azam T20I Comeback Rumors : माजी कर्णधार बाबर आझमच्या टी-20 संघात पुनरागमनावरुन आणि मोहम्मद रिझवानला एकदिवसीय कर्णधारपदावरून हटवून नवीन कर्णधार नियुक्त करण्याच्या अफवांनी जोर धरला आहे. 24 ऑक्टोबरला कसोटी मालिका संपल्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय आणि टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. यानिमित्ताने सोशल मीडियापासून मुख्य प्रवाहातील माध्यमांपर्यंत वरिष्ठ खेळाडूंना प्रोत्साहन देण्याची स्पर्धा सुरू आहे. निवड समितीच्या एका विश्वसनीय सूत्राने अफवांना खोडून काढले – निवड समितीच्या एका विश्वसनीय सूत्राने रिझवानला कर्णधारपदावरून हटवण्याच्या अफवांना खोडून काढले आणि सांगितले की, जर असा निर्णय झालाच, तर शाहीन आफ्रिदीऐवजी टी-20 कर्णधार सलमान अली आघा याला ही जबाबदारी मिळू शकते, पण सध्यातरी असा कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. स्वतःला सिद्ध केल्यानंतरच संघात बाबरचा समावेश होवू शकतो – पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या टी-20 संघात बदलाची चर्चा सुरू आहे. बाबर आझमला टी-20 मालिकेत परत आणण्याच्या मागणीला विरोध होत आहे. तो बिग बॅश लीगमध्ये खेळल्यानंतर आणि आधुनिक टी-20 क्रिकेटच्या गरजांनुसार स्वतःला सिद्ध केल्यानंतरच पाकिस्तानच्या संघात बाबरचा समावेश होवू शकतो. हेही वाचा – IND vs AUS : पर्थच्या खेळपट्टीवर गिलच्या नेतृत्वाची कसोटी, भारताचा विजयी प्रारंभ होणार का? जाणून घ्या पिच रिपोर्ट आधुनिक टी-20 क्रिकेटच्या वेगाशी जुळवून घेण्यात त्याची असमर्थता दिसून येत आहे. पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक माईक हेसन तरुण खेळाडूंना संधी देण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे बाबर आझमचे टी-20 संघात पुनरामन होईल का? या प्रश्नाचे उत्तर सध्या तरी नकारार्थीच आहे.