बाबा सिद्दिकी हत्या: 13 आरोपींना 16 डिसेंबरपर्यंत कोठडी
Updated On:

मुंबई – राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकींच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 13 आरोपींना विशेष न्यायालयाने 16 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सिद्दिकी हत्या प्रकरणात आजवर 26 जणांना अटक करण्यात आली आहे. यात शार्पशूटर शिवकुमार गौतमचा समावेश आहे.
पोलिसांनी 30 नोव्हेंबर रोजी सर्व 26 आरोपींविरुद्ध मकोकांतर्गत कडक तरतुदी लागू केल्या. 26 पैकी 13 आरोपींना मकोका कोर्टात हजर केले असता त्यांना 16 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. उर्वरित अटकेतील आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत.
तुरुंगात असलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णाेईचा भाऊ अनमोल आणि शुभम लोणकर या गुन्ह्यात आरोपी आहेत. 66 वर्षीय बाबा सिद्दिकी यांची 12 ऑक्टोबर रोजी हत्या झाली होती.





