Baba Siddique : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी आरोपी शिव कुमार गौतमने केला ‘हा’ मोठा खुलासा

मुंबई : माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्याप्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येताना दिसत आहेत. या हत्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी आतापर्यंत १७ जणांना अटक केली आहे. आता या प्रकरणात मारेकऱ्यांनी हत्येचा कट कसा रचला, कट कसा यशस्वी केला, गोळीबारानंतर कसे फरार झाले याविषयीची माहिती समोर आली आहे.
‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर
मुख्य आरोपी शिव कुमार गौतमने सांगितलं की 12 ऑक्टोबर रोजी बाबा सिद्दिकींवर गोळीबार केल्यानंतर तो तिथून पळून गेला नाही. बाबा सिद्दिकींना त्यांच्या कार्यकर्त्यांनी लीलावती रुग्णालयात नेलं होतं. त्यामुळे शिवा देखील लीलावती रुग्णालयात गेला. गोळीबारात सिद्दिकी यांचा मृत्यू झाला आहे की नाही याची शहानिशा करून घेण्यासाठी तो तिथे गेला होता.
शिवा तब्बल अर्धात तास रुग्णालयात व रुग्णालयाच्या आवारात फिरत होता. बाबा सिद्दिकींची प्रकृती नाजूक असल्याची माहिती त्याला मिळाली. सिद्दिकी बचावण्याची शक्यता फारच कमी असल्याची माहिती मिळाल्यानंतर शिवा तिथून बाहेर पडला आणि फरार झाला.हा जबाब ऐकून पोलिसांना देखील धक्का बसला आहे.





