“मला गोळी लागलीय, मी मरतोय” हे त्यांचे होते शेवटचे वाक्य” ; बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा

Baba Siddique Murder Case । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हाती प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. त्यातच आता या प्रकरणी मोठा खुलासा करण्यात आला आहे. बाबा सिद्दीकी यांना ज्यावेळी गोळी लागली होती त्यावेळी त्यांनी, मला गोळी लागली आहे मी मरतोय हे शेवटचे वाक्य बोलले असल्याचे सांगण्यात येत आहे.
वसीम मन्सूरी नावाच्या सामाजिक कार्यकर्त्याने या प्रकरणात मोठा खुलासा केला आहे. मुंबई पोलिसांना वसीम मन्सूरी यांनी जबाब दिला आहे. यात वसीम यांनी, “जेव्हा बाबा सिद्दीकी यांना गोळी लागली तेव्हा तो बाबा सिद्दीकीच्या शेजारी उभा होता. त्यांनी सांगितले की, आम्हाला फटाके फुटल्यासारखे वाटले, पण तेव्हा बाबा सिद्दीकी म्हणाले, “मला गोळी लागली आहे, मी मरत आहे” असे म्हणाले होते. तसेच त्यांचे कपडे पूर्णपणे रक्ताने माखलेले मी पाहिले.” असे त्यांनी म्हटले आहे.
वसीम मन्सूरी म्हणाले, “मी आमदार झीशान झियाउद्दीन सिद्दीकी यांच्या मतदारसंघातील एका वॉर्डचे प्रतिनिधित्व करतो. झीशान सिद्दीकी यांच्या मतदारसंघात राहणाऱ्या मतदारांना स्वच्छता, रुग्णालयाशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास किंवा कोणत्याही प्रकारची मदत हवी असल्यास, मी झीशान सिद्दीकी यांच्या वतीने त्यांच्याशी संपर्क साधतो आणि समस्या घेऊन येणाऱ्या लोकांना मदत करतो. मी त्यांचे समाधान करण्याचे काम करतो. .” अशी माहिती त्यांनी दिली.
झीशान सिद्दीकीसोबत ७ वर्षांपासून काम Baba Siddique Murder Case ।
मन्सूरी पुढे म्हणाले,”मी गेल्या ७ वर्षांपासून झीशान सिद्दीकीसोबत काम करत आहे. मी दिवसभर माझ्या ऑफिसमध्ये काम करतो आणि संध्याकाळी त्यांना भेटतो. १२ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७:३० वाजता मी झीशान सिद्दीकीच्या कार्यालयात गेलो तेव्हा झीशान सिद्दीक आणि त्यांचे वडील बाबा सिद्दीक तिथे बसले होते. यानंतर, मी काही कामगारांसह ऑफिसमध्ये झीशानला भेटलो. मग मी त्याच्या ऑफिसबाहेर बसलो. त्यावेळी सुहेल सिद्दीकी आणि फहीम सय्यद तिथे उपस्थित होते.
वसीम मन्सूरीचा मोठा खुलासा
वसीम मन्सूरी यांनी यावेळी मोठा खुलासा करताना, “ झीशान रात्री ९:३० च्या सुमारास ऑफिसमधून बाहेर पडले. पण ते परत येणार असल्याने आम्ही ऑफिसमध्येच थांबलो. सुमारे ५ ते १० मिनिटांनी बाबा सिद्दीकी निघू लागले. त्याची रेंज रोव्हर गाडी थोडी दूर उभी असल्याने, इक्बाल, शम्स आणि मी त्यांना गाडीजवळ सोडले. त्यावेळी शम्स आणि मी बाबा सिद्दीकी यांच्या उजव्या बाजूला आणि इक्बाल भाई त्यांच्या डाव्या बाजूला उभे होतो. त्याच क्षणी, शम्सच्या पायाजवळ फटाके फुटल्यासारखा आवाज आला आणि माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.असे ते म्हणाले.
“मला गोळी लागली आहे, मी मरत आहे” Baba Siddique Murder Case ।
वसीम मन्सूरी यांनी पुढे सांगितले,” त्यावेळी बाबा सिद्दीकी यांनी आम्हाला विचारले, “फटाके कोण फोडत आहे?” आम्ही त्यांना सांगत होतो की आम्ही देवीला विसर्जनासाठी घेऊन जात आहोत आणि कदाचित कोणीतरी फटाके फोडले असतील, पण थोड्या वेळाने आम्हाला पुन्हा फटाक्यांसारखा आवाज ऐकू आला आणि प्रकाशासारखे काहीतरी दिसले. त्यावेळी बाबा सिद्दीकी आम्हाला म्हणाले, “मला गोळी लागली आहे, मी मरत आहे.” त्यावेळी मला लक्षात आले की त्याने घातलेला टी-शर्ट रक्ताने माखलेला होता. त्यावेळी मी मागून बाबा सिद्दीकीला आधार देत असताना, मी तीन जणांना गोळीबार करून तिथून पळून जाताना पाहिले.”असा मोठा खुलासा यावेळी मन्सुरी यांनी केला.
मन्सुरी यांनी पुढे, “त्यानंतर कार्यालयात उपस्थित असलेले काही लोक गाडीकडे धावले. त्यावेळी आम्ही आणि पोलिस सुरक्षा रक्षकांनी जखमी बाबा सिद्दीकीला रेंज रोव्हरमध्ये बसवले आणि त्यानंतर युसूफ मादी आणि अब्दुल्ला त्याच्यासोबत गाडीत बसले. त्यानंतर, मी आणि इतर जण बाईकवर बसलो आणि वाहतूक सुरळीत करत जखमी बाबा सिद्दीकी यांना रुग्णालयात नेले आणि त्यांना लीलावती रुग्णालयाच्या आपत्कालीन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर झीशान सिद्दीकीही तिथे पोहोचले. मात्र काही वेळातच डॉक्टरांनी बाबा सिद्दीकी यांना मृत घोषित केले. ” अशी माहिती वसीम मन्सुरी यांनी आपल्या जबाबात नोंदवली आहे.
हेही वाचा
महाकुंभ चेंगराचेंगरी ! अखिलेश यादव यांनी योगी सरकारला घेरले ; भाविकांसाठी केल्या ‘या’ विशेष मागण्या





