Important Update : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मुंबई क्राईम ब्रँचची मोठी कारवाई…

मुंबई ( Baba Siddique Murder )- अजित पवार गटाचे नेते आणि मुंबईतील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व बाबा सिद्दीकी यांची काही दिवसांपूर्वी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली . या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोई टोळी असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
अशातच या प्रकरणात मुंबई क्राईम ब्रँचने शुक्रवारी मोठी कारवाई करत पाच आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींवर सिद्दीकी यांच्या हत्येच्या कटात सहभाग आणि हत्या करणाऱ्यांना सहाय्य केल्याचा आरोप आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे । Baba Siddique Murder
नितीन गौतम सप्रे (३२) – डोंबिवली
संभाजी किशन परबी (४४) – अंबरनाथ
राम फुलचंद कन्नौजिया (४३) – पनवेल
प्रदीप तोंबर (३७) – अंबरनाथ
चेतन दिलीप पारधी (३३) – अंबरनाथ
पोलीस सूत्रांनी याबाबत दिलेल्या माहीनुसार , नितीन सप्रे आणि राम कन्नौजिया हे टोळीचे मुख्य सूत्रधार आहेत. त्यांनी हत्या करणाऱ्यांना शस्त्र पुरवली होती. हे दोघे धर्मराज कश्यप आणि शिवकुमार या शूटर्सशी थेट संपर्कात असल्याचेही पोलीस तपासात समोर आले आहे. हे दोघेही दोन महिने कर्जतमध्ये शूटर्ससोबत वास्तव्यास असल्याचेही समोर आले आहे.
आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी | Baba Siddique Murder
अटक करण्यात आलेल्या नितीन सप्रेवर खून, हत्येचा प्रयत्न आणि आर्म्स ऍक्टचे गुन्हे नोंद आहेत, तर राम कन्नौजियावरही विविध गुन्हे दाखल आहेत. सप्टेंबर महिन्याच्या सुमारास या आरोपींना शस्त्रे पुरवण्यात आली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. हे आरोपी झिशान अख्तर आणि शुभम लोणकर या अटक झालेल्या इतर आरोपींच्या संपर्कात होते.
झीशान सिद्दीकी यांचे निवेदन | Baba Siddique Murder
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर त्यांचा मुलगा, झीशान यांनी एक निवेदन जारी करत आपलं दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी म्हटले, “माझ्या वडिलांनी गरीब आणि निष्पाप लोकांचे रक्षण करताना आपले प्राण गमावले. आमचे कुटुंब दु:खात आहे, मात्र त्यांच्या मृत्यूचं राजकारण होऊ नये. आम्हाला न्याय हवा आहे.”
मुंबई क्राईम ब्रँचने या प्रकरणाचा तपास अधिक तीव्र केला असून या प्रकरणात आणखी काही आरोपींच्या अटकेची शक्यता व्यक्त होत आहे.





