Baba Siddique : ‘बाबा सिद्दीकी यांचे दाऊदशी संबंध’; आरोपीचा धक्कादायक खुलासा, नाना पटोले म्हणतात, “दाल मे कुछ काला है”

Baba Siddique – बाबा सिद्दिकीच्या हत्येप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने आणखी पाच आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणी आतापर्यंत एकूण ९ जणांना अटक करण्यात आली आहे.
नवी मुंबई, कर्जत आणि डोंबिवली परिसरातून पाच आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या सर्वांचे लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंध आहेत. त्याचबरोबर अटक करण्यात आलेले चार आरोपी २१ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत आहेत.
दरम्यान, अश्यातच एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. दिल्लीमध्ये एका व्यायामशाळेच्या मालकाची हत्या केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशमधून बिश्नोई टोळीच्या योगेश कुमारला नुकतीच अटक झाली.
हा आरोपी पोलिसांच्या कोठडीत असताना त्याने माध्यमांशी संवाद साधला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला असून त्यात त्याने बाबा सिद्दीकी यांच्यावर विविध आरोप केले आहेत.
“बाबा सिद्दीकी हे चांगले व्यक्ती नव्हते, त्यांच्यावर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झालेला होता. तसेच त्यांचे आणि कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचे संबंध होते”, असा दावा योगेश कुमारने केला आहे.
मृत्यूनंतरही बदनामी करायची, हे हीन कृत्य फक्त भाजपच करू शकते. नाहीतर एका खुन्याला पत्रकार परिषद कशी घेवू दिली जाते?
दाल मे कुछ काला है!#LawlessState pic.twitter.com/uq10mxHA8S— Nana Patole (@NANA_PATOLE) October 19, 2024
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सदर व्हिडीओ आपल्या एक्स अकाऊंटवर टाकून भाजपावर टीका केली आहे. “मृत्यूनंतरही बदनामी करायची, हे हीन कृत्य फक्त भाजपाच करू शकते. नाहीतर एका खुन्याला पत्रकार परिषद कशी घेऊ दिली जाते? दाल मे कुछ काला है.” असं नाना पटोले म्हणाले आहेत.
फडणवीसांच्या भेटीनंतर झिशान सिद्दीकींनी केली शेअर केली ‘रहस्यमय’ पोस्ट :
देवेंद्र फडणवीसांच्या भेटी नंतर झिशान सिद्दीकी यांनी सोशल मीडियावर रहस्यमय पोस्ट केली आहे. जिशान सिद्दिकी यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘Not all that is hidden sleeps, Nor all that is visible speaks’ याचा अर्थ ‘
जे लपलेले सर्व झोपत नाही आणि जे दिसते ते बोलत नाही’ असा काही आहे. त्यामुळे जिशान सिद्दिकी यांना या पोस्टमधून बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात काही इशारा देयायचा आहे का? हा ही एक प्रश्न आहे.
आतापर्यंत एकूण ९ आरोपींना अटक :
मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची पथके देशाच्या विविध भागात पाठवण्यात आली होती. ते आरोपींचा शोध घेत आहेत.
शुक्रवारी त्यांना मोठे यश मिळाले. पोलिसांना विशेष माहिती मिळाली होती. त्याआधारे रायगड जिल्ह्यातील कर्जत आणि पानवे येथे गुन्हे शाखेने छापे टाकले. या छाप्यादरम्यान पोलिसांनी कट रचून गुन्ह्याची अंमलबजावणी केल्याप्रकरणी पाच जणांना अटक केली.





