baba ramdev patanjali: बाबा रामदेव व पतंजलीवरील अवमानना कारवाई रद्द ! सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं….

baba ramdev । patanjali- दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसारीत केल्या प्रकरणी योगगुरू रामदेव, त्यांचे सहकारी बाळकृष्ण आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेड यांनी मागितलेली माफी सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली असून त्यांनी आज त्या विषयी रामदेव बाबा व अन्य संबंधीतांवरील न्यायालयाची बेअदबी केल्या प्रकरणाची कारवाई बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
बाबा रामदेव, बाळकृष्ण आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेड यांनी दिलेल्या हमींच्या आधारे न्यायालयाने अवमानाची कारवाई बंद केली आहे, अशी माहिती त्यांचे वकील गौतम तालुकदार यांनी दिली.
न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला यांच्या खंडपीठाने या प्रकरणात रामदेव, बाळकृष्ण आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेड यांना बजावलेल्या अवमान नोटीसवर १४ मे रोजी आपला आदेश राखून ठेवला होता.
रामदेव बाबांच्या जाहीरातींवर इंडियन मेडिकल असोशिएशनने आक्षेप घेतला होता. या बाबत बाब रामदेव यांच्यावर २७ फेब्रुवारी रोजी आपल्या विरोधात अवमानना कारवाई का सुरू करू नये अशी नोटीस सर्वोच्च न्यायालयाने बजावली होती.
परंतु यापुढे आमच्याकडून अशी कृती होणार नाही अशी ग्वाही बाबा रामदेव व पतंजली संस्थने कोर्टात दिली आहे. त्या आधारावर ही कारवाई रद्द करण्यात आली आहे.





