लंडन : भारतीय संविधान ही शाईने लिहिलेली एक शांत क्रांती आहे. ही एक परिवर्तनकारी शक्ती आहे, जी आपल्याला अधिकारांची हमी देते, असे मत भारताचे सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी व्यक्त केले. तसेच भारतीय संविधान हा एक सामाजिक दस्तऐवज आहे जो सर्व समान असल्याचे भासवत नाही. परंतु शक्ती पुनर्संचयित आणि प्रतिष्ठा पुनर्संचयित करण्यासाठी हस्तक्षेप करण्याचे धाडस करतो, असे त्यांनी स्पष्ट कले. ऑक्सफर्ड युनियनमध्ये प्रतिनिधित्वापासून अंमलबजावणीपर्यंत संविधानाचे वचन साकार करणे या विषयावर सरन्यायाधीशांनी आपले विचार मांडले. सरन्यायाधीश गवई यांनी संविधानाचे वर्णन शाईने कोरलेली शांत क्रांती आणि एक परिवर्तनकारी शक्ती आहे, जी केवळ हक्कांची हमी देत नाही तर ऐतिहासिकदृष्ट्या पीडितांना सक्रियपणे उन्नत करते, असे अधोरेखित केले. बी. आर. गवई म्हणाले, अनेक दशकांपूर्वी भारतातील लाखो नागरिकांना अस्पृश्य म्हटले जात असे. त्यांना सांगण्यात यायचं की, ते अशुद्ध आहेत. ते कोणत्याही जातीचे नाहीत. ते त्याचं मत व्यक्त करू शकत नाहीत. पण आज आपण येथे आहोत, जिथे त्याच लोकांशी संबंधित एक व्यक्ती उघडपणे बोलत आहे. देशाच्या न्यायव्यवस्थेत सर्वोच्च पदावर आहे, असेही त्यांनी सांगितले. संविधानात नागरिक विचार व्यक्त करू शकतात. मग ते कोणत्या जातीचे आहेत, हे पाहिले जात नाही. समाजाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात त्यांना समान स्थान आहे. आज मी ऑक्सफर्ड युनियनमध्ये तुमच्यासमोर हे सांगण्यासाठी उभा आहे. भारतातील नागरिकांसाठी संविधान हे केवळ कायदेशीर सनद किंवा राजकीय चौकट नव्हे, तर ती एक भावना आहे, एक जीवनरेखा आहे. महानगरपालिका शाळेपासून ते भारताच्या सरन्यायाधीशांच्या कार्यालयापर्यंतच्या माझ्या स्वतःच्या प्रवासात हीच मार्गदर्शक शक्ती सोबत राहिली आहे, असेही त्यांनी सांगितले. संविधान हा एक सामाजिक दस्तऐवज भारताचे संविधान केवळ एक कायदेशीर चौकट नाही, तर खोल असमानतेमध्ये तयार केलेले सामाजिक आणि नैतिक दस्तऐवज आहे. त्याच्या मसुदा तयार करणाऱ्यांमध्ये भारतातील काही सर्वात दुर्लक्षित समुदायांचे प्रतिनिधी समाविष्ट होते. दलित, आदिवासी, महिला, धार्मिक अल्पसंख्याक, अपंग व्यक्ती आणि अगदी ज्यांना पूर्वी गुन्हेगार जमाती म्हटले जाते अशांसाठी संविधान हा एक सामाजिक दस्तऐवज आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वारशाचा उल्लेख करताना ते म्हणाले की, ते एक दूरदर्शी व्यक्तिमत्त्व होते, ज्यांनी जातीभेदाच्या अनुभवाचे रूपांतर न्यायाच्या जागतिक समजुतीत केले. बाबासाहेबांना असे वाटायचे की, लोकशाहीचा पाया सामाजिक लोकशाही असल्याशिवाय टिकू शकत नाही, असेही ते म्हणाले.