Satara News : आयुष्मान उपकेंद्रामुळे गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा मिळेल : मंत्री जयकुमार गोरे

वडूज : आयुष्मान आरोग्य मंदिर प्राथमिक उपकेंद्रामुळे स्थानिक रहिवाशांना तसेच शेजारील गावातील नागरिकांना त्यांच्या परिसरातच त्वरित व गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील शेवटच्या नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवणे हेच महायुती सरकारचे प्राथमिक उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास व पंचायतराज मंत्री ना. जयकुमार गोरे यांनी केले.
भुरकवडी (ता. खटाव) येथे ना. जयकुमार गोरे (भाऊ) यांच्या माध्यमातून निधी मंजूर करून उभारण्यात आलेल्या आयुष्यमान आरोग्य मंदिर प्राथमिक उपकेंद्राचे उद्घाटन व लोकार्पण ना. जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
ना. जयकुमार गोरे म्हणाले, भुरकवडी गावचे ग्रामस्थ आणि परिसरातील लोकसंख्येचा विचार करता स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा दृष्टीने गावात प्राथमिक आरोग्य उपकेंद्र असावे, ही स्थानिक नागरिकांची मागणी होती. या मागणीबाबत माझ्याकडे केलेल्या सततच्या पाठपुराव्यानंतर या ठिकाणी निधी मंजूर करून भव्य अशी उपकेंद्राची इमारत उभी करण्यात आली आहे. त्याचा येथील नागरिकांना फायदा होईल.
यावेळी माजी आमदार डॉ. दिलीपरावयेळगावकर, उद्योजक अंकुश गोरे, भाजपचे खटाव तालुकाध्यक्ष अनिल माळी, भाजप माण विधानसभा प्रमुख सोमनाथ भोसले, माण खटाव विधानसभा संयोजक युवानेते विशाल बागल, मंत्रालय कक्षाधिकारी प्रवीण कदम, माजी पंचायत समिती सदस्य भरतशेठ जाधव, डॉ. विवेक देशमुख, भाजप सातारा जिल्हा उपाध्यक्ष संजयशेठ शितोळे (सरकार), गटविकास अधिकारी योगेश कदम, वैद्यकीय अधिकारी शेख, शरद कदम, युवामोर्चा अध्यक्ष अक्षय थोरवे, संतोष जाधव चेअरमन, बाबासाहेब जाधव, हरिदास बनसोडे, गणेश गोडसे, नगरसेवक सुधीर गोडसे, भुरकवडीच्या सरपंच रेश्मा कदम, उपसरपंच शीतल कदम व सर्व सदस्य, माजी सरपंच शिवाजीराव कदम, एस. के. कदम, प्रवीण कदम, छगन कदम, दिलीप गाडे, शामराव कदम, युवानेते मनोजदादा कदम, अविनाश कदम, सुखदेव जाधव, साहेबराव कदम, ग्रामसेविका दिपाली गायकवाड, आशा सेविका रेश्मा फडतरे, सिमा जाधव, शिवाजी राजगे, संदीप गुरव व आजी-माजी पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात ना. जयकुमार गोरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.





