राष्ट्रीय नेमबाजी पात्रता स्पर्धा : आयुषी पोद्दारने पटकावलं सुवर्णपदक
Updated On:

तिरूअनंतपुरम : राष्ट्रीय नेमबाजी पात्रता स्पर्धेमध्ये आयुषी पोद्दार हिने ५० मी. रायफल थ्री पोझिशन ज्युनियर आणि सिनियर अशा दोन्ही गटात अव्वल राहत सुवर्णपदक पटकावले.
आयुषीने सिनियर गटामध्ये ४२५.३ गुण मिळवले तर ज्युनियर गटात ४२५.२ गुण मिळविले. तिने सिनियर गटाच्या अंतिम फेरीत तामिळनाडुच्या एन गायत्री हिचा तर ज्युनियर गटात मध्यप्रदेशच्या बंधवी सिंह हिचा पराभव करत अव्वल स्थान पटकावले.





