GT vs CSK : आयुष म्हात्रेचा कहर! चौकार-षटकारांचा पाऊस पाडत एकाच षटकात कुठल्या तब्बल ‘इतक्या’ धावा

GT vs CSK Ayush Mhatre’s explosive 28 run over : आयपीएल २०२५ च्या लिलावात मुंबईचा युवा फलंदाज आयुष म्हात्रेला कोणीही खरेदी केले नव्हते. पण चेन्नई सुपर किंग्जची नजर आयुषवर होती. सीएसकेने कर्णधार ऋतुराज गायकवाडला दुखापत झाल्यानंर त्याच्या जागी आयुष म्हात्रेला संधी दिली. या १७ वर्षीय फलंदाजाला चेन्नईकडून सलामीची संधी मिळाली. या संधीचं सोनं करताना त्याने गुजरातविरुद्धच्या सामन्यात एका षटकात २८ धावा करत सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.
एकाच षटकात कुठल्या तब्बल २८ धावा –
गुजरात टायटन्सविरुद्ध आयुष म्हात्रेने एकाच षटकात २८ धावा केल्या. सीएसकेच्या डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या म्हात्रेने दुसऱ्याच षटकात ही स्फोटक कामगिरी केली. गुजरातकडून अर्शद खानने दुसरे षटक टाकले. आयुषने पहिल्या चेंडूवर दोन धावा काढल्या. यानंतर, त्याने पुढचा चेंडू लाँग ऑनवर षटकारासाठी पाठवला. म्हात्रेने षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर षटकारही मारला.
Carnage mode ON! Ayush Mhatre smashes Arshad Khan for 28 runs in an over!
📷: JioHotstar#AyushMhatre #CSKvsGT pic.twitter.com/GKIQy9I92V
— CricTracker (@Cricketracker) May 25, 2025
सलग दोन षटकार मारल्यानंतर आयुषने दोन चौकार मारले. षटकाच्या सुरुवातीला ५ चेंडूत २२ धावा दिल्यानंतर, अर्शद खानने शेवटचा चेंडू बाऊंसर टाकला. ज्याच्यासाठी आयुष तयार होता आणि त्याने फाइन लेगवर षटकार मारला. अशाप्रकारे, आयुषने गुजरातच्या गोलंदाजाविरुद्ध एकाच षटकात २८ धावा कुढल्या. ज्यामुळे सीएसकेला २०० धावांचा टप्पा ओलांडण्यात महत्त्वाची मदत झाली.
हेही वाचा – PBKS vs DC : ‘…तर ही गोष्ट असह्य आहे’, थर्ड अंपायरच्या निर्णयावर संतापली प्रीती झिंटा, पाहा VIDEO
सीएसकेने गुजरातसमोर ठेवले २३१ धावांचे लक्ष्य –
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सीएसकेने गुजरातसमोर २३१ धावांच लक्ष्य ठेवलं आहे. चेन्नईकडून डेव्हॉन कॉनवे आणि डेवाल्ड ब्रेव्हिस यांनी अर्धशतकं झळकावली. कॉनवेने ३५ चेंडूत ५२ धावा केल्या. त्याचबरोबर ब्रेव्हिसने २३ चेंडूत ५७ धावांची तुफानी खेळी साकारली, तर उर्विल पटेलने १९ चेंडूत ३७ आणि आयुष म्हात्रेने १७ चेंडूत ३४ धावांचे योगदान दिले. त्यामुळे सीएसकेने २० षटकांत ५ गडी गमावून २३० धावा केल्या. गुजरातकडून प्रसिद्ध कृष्णाने दोन आणि साई किशोर, राशीद खान आणि शाहरुख खान यांना प्रत्येकी एक विकेट्स मिळाली.





