Ayodhya: रात्रीच्या वेळी असा दिसतो भव्य राम मंदिर परिसर, आतील फोटो पाहा, देवलोकासारखे आहे दृश्य

Ayodhya ram mandir campus pics – अयोध्येत बांधले जाणारे भगवान श्री रामाचे भव्य मंदिर अतिशय अप्रतिम आहे. जगभर पसरलेले कोट्यवधी रामभक्त रामललाच्या दरबारात कधी हजेरी लावतील याची वाट पाहत आहेत. मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात असून गर्भगृहापासून तळमजल्यावरची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे.
22 जानेवारी रोजी आयोजित प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानंतर मंदिर सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात येणार आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट वेळोवेळी मंदिराची छायाचित्रे प्रसिद्ध करत असते. ट्रस्टने नव्याने प्रसिद्ध केलेल्या छायाचित्रांवरून हे मंदिर रात्रीच्या वेळी अतिशय भव्य दिसत आहे. त्याचे सौंदर्य पाहण्यासारखे आहे.
ट्रस्टने मंदिराची चार नवीन छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत…

मंदिराच्या आतील दृश्य विलोभनीय आहे. भाविकांच्या कल्पनेनुसार हे मंदिर भव्य आणि दिव्य असेल असे दिसते.

राम मंदिराचे रात्रीचे दृश्य.

मंदिराच्या आत भव्य कोरीव काम करण्यात आले आहे.

मंदिर परिसराचे दृश्य. संकुलात आकर्षक शिल्पे तयार करण्यात आली आहेत.

अयोध्येच्या तात्पुरत्या मंदिरात बसलेले रामलला.

22 जानेवारी रोजी नवीन मंदिराच्या गर्भगृहात रामललाची प्रतिष्ठापना होणार आहे.





