Ram Mandir Donation: रामलल्लाच्या दर्शनासाठी रिघ…, 8 दिवसांत राम मंदिरात आले ‘इतके’ दान

Ram Mandir Donation: अयोध्येत भगवान श्री राम लल्ला यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर 23 जानेवारी 2024 पासून राम मंदिराचे दरवाजे सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले. तेव्हापासून राम मंदिरात राम ललाचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या सातत्याने वाढत आहे. यासोबतच लोक रामाच्या नावाने भरपूर दान करत आहेत.
सहा दिवसांत 19 लाख भाविक –
राम मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर अवघ्या सहा दिवसांत सुमारे 19 लाख भाविक येथे पोहोचले आहेत आणि ही संख्या सातत्याने वाढत आहे. त्यांच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी आणि प्रार्थना करण्यासाठी भाविक येथे पोहोचत आहेत. 22 जानेवारीला अभिषेक सोहळ्यानंतर, 23 जानेवारी रोजी मंदिराचे दरवाजे भक्तांसाठी खुले करण्यात आले, ज्यामध्ये देशाच्या विविध भागातून भाविकांचा ओघ होता. येथे दररोज सुमारे 2 लाख भाविक प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी येत आहेत.
राममंदिराच्या उद्घाटनानंतर केवळ अयोध्येतच नाही तर देशभरात रामाच्या नावाचा उत्साह पाहायला मिळत असून, त्यांच्या दर्शनासाठी भाविक सतत मंदिरात पोहोचत आहेत. भक्त अजूनही रामललाला सतत काही ना काही अर्पण करत आहेत. या भेटवस्तू सोन्या-चांदीच्या दागिने रोख रक्कम, धनादेशाद्वारे दिले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 22 जानेवारीला 2 लाख रुपयांचा धनादेश, 6 लाख रुपये रोख, 23 तारखेला 2.62 कोटी रुपयांचे धनादेश, 27 लाख रोख, 24 जानेवारीला 15 लाख रुपयांचे धनादेश, रोख, 25 जानेवारीला 40 हजार रुपयांचा धनादेश, 8 लाख रुपये रोख, 26 जानेवारीला 1,04,60,000 रुपयांचे धनादेश, 5.50 लाख रुपये रोख, 27 जानेवारीला 13 लाखांचे धनादेश, 8 लाख रुपये रोख, 28 जानेवारीला 12 लाख रुपये रोख, 29 जानेवारीला 7 लाख रुपयांचा धनादेश, 5 लाख रुपये रोख दान प्राप्त झाले आहे. एकूण जवळपास 5 कोटींहून अधिक दान प्राप्त झाले आहे.
दरम्यान, 23 जानेवारीला 5 लाख, 24 जानेवारीला 2.5 लाख, 25 जानेवारीला 2 लाख, 26 जानेवारीला 3.5 लाख, 27 जानेवारीला 2.5 लाख, 28 जानेवारीला 3.25 लाख भाविकांनी रामलल्लाचे दर्शन घेतले आहे.





