Ayodhya Ram Mandir : राम मंदिरामुळे देशभरात 1 लाख कोटी रुपयांचा व्यापार ; उद्या देशातील व्यापारी साजरा करणार उत्साह

Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराचा अभिषेक होण्याची वेळ जवळ आली आहे. सोमवार 22 जानेवारीला अयोध्येत राममंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापणा मोठ्या थाटामाटात होणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी अनेक स्तरांतून सुरू असून,सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या वातावरणाचा व्यापारी जगतालाही मोठा फायदा झाल्याचे दिसून येत आहे. कारण आजपर्यंत देशभरातील विविध व्यापाऱ्यांनी कोट्यवधींचा व्यवसाय केला असल्याची माहिती समोर येत आहे.
राम मंदिरामुळे एवढ्या कोटींचा व्यवसाय
CAT म्हणजेच कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स या किरकोळ व्यापाऱ्यांची संघटना असलेल्या राम मंदिराच्या अभिषेक प्रस्तावित कार्यक्रमामुळे निर्माण झालेल्या वातावरणामुळे देशभरातील व्यापाऱ्यांना 1 लाख कोटी रुपयांहून अधिकचा व्यवसाय झाला आहे. CAT च्या म्हणण्यानुसार, राम मंदिरामुळे गेल्या काही दिवसांत व्यापाऱ्यांनी 1 लाख कोटींहून अधिक रुपयांचा व्यवसाय केला आहे.
देशभरात 30 हजारांहून अधिक कार्यक्रम होणार
कॅटचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले की, सोमवारी दिल्लीत 2 हजारांहून अधिक छोटे-मोठे कार्यक्रम होणार आहेत. देशभरात 30 हजारांहून अधिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यांनी दावा केला – या शतकातील हा सर्वात मोठा दिवस असेल, जेव्हा एकाच दिवशी अनेक कार्यक्रम होतील.
त्यांनी सांगितले की, आज घरे, बाजार, मंदिरे आणि इतर ठिकाणे सजवण्यासाठी फुलांची मागणी खूप वाढली आहे. मातीचे दिवे विकत घेणारा लोकांचाही ओघ कायम आहे. मिठाईच्या दुकानांवर मोठी गर्दी दिसून येत आहे. लोक प्रसादासाठी मोठ्या प्रमाणात मिठाई खरेदी करत आहेत. बाजारात राम झेंडे आणि राम फलकांचा तुटवडा निर्माण झाला आहे.





