आयशा टाकियाने ट्रोलिंगला कंटाळून डिलीट केले ‘इंस्टाग्राम खाते’

Ayesha Takia । टारझन आणि वॉन्टेड सारख्या चित्रपटांमुळे आयशा टाकिया एकेकाळी नॅशनल क्रश बनली होती. तिच्या सौंदर्याने लोकांना वेड लावले होते, मात्र गेल्या काही काळापासून ती प्लास्टिक सर्जरी करण्याच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. अलीकडेच तिने एक फोटो शेअर केला आहे. ज्यामुळे ती चांगलीच ट्रोल झाली. आयशाने सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर आता मोठे पाऊल उचलले आहे.
आयशा टाकियाने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो पोस्ट केला होता. कारमध्ये सेल्फी घेताना दिसलेल्या आयशाने पारंपारिक लूक कॅरी केला होता. तिने निळ्या आणि सोनेरी रंगाची सिल्क साडी घातली. सोन्याच्या दागिन्यांसह तिचा लूक पूर्ण केला. ग्लॉसी ओठ शेड मोकळे केस असा तिचा लुक या फोटोत दिसून येतो.
मात्र या फोटोमुळे आयशाला पुन्हा एकादा प्लास्टिक सर्जरी केली असल्याचे म्हणत ट्रोल केले आहे. त्यामुळे आयशा टाकियाने इंस्टाग्राम अकाउंट डिलीट केले आहे. सततच्या ट्रोलिंगनंतर आयशा टाकियाने तिचे अधिकृत इंस्टाग्राम खाते बंद केले आहे. तिचे इन्स्टाग्रामवर आयशा टाकिया आझमीच्या नावाने खाते होते, ज्याचे 2 दशलक्ष फॉलोअर्स होते. आयशा स्वतः 7773 लोकांना फॉलो करत होती आणि तिने 1290 पोस्ट शेअर केल्या होत्या. मात्र तिचे हे सोशल मीडियावर खाते आता दिसत नाही आहे.
यापूर्वी तिला युजर्सनी प्लास्टिक सर्जच्या मुद्यावरून ट्रोल केले होते. या ट्रोलिंगला कंटाळून आयशाने एक लांबलचक नोट लिहून ट्रोल्सना चोख प्रत्युत्तर दिले होते. मात्र यावेळी ट्रोलिंगला कंटाळून तिने खाते बंद केले आहे.






