पुरस्कारांमुळे जबाबदारी वाढते – सुमित्रा महाजन

पुणे – पुरस्कार मिळाल्यावर जबादारी वाढते आणि पुढील कामासाठी प्रेरणा मिळत असते. आपल्या पुढील कामासाठीचं असलेलं भान आपल्याला पुरस्कार देत असतात, असे मत लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन यांनी व्यक्त केले. आत्मोन्नती विश्वशांती साधक संस्था व माईर्स एम आय टी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आदिशक्ती मुक्ताई स्मृतिगौरव व सामाजभूषण गौरव सोहोळयास त्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.
संत साहित्याचे अभ्यासक व महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती महामंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. यावेळी कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल, दगडूशेठ गणपती मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष माणिकराव चव्हाण, माईर्स एमआयटीच्या सुचित्रा कराड, संस्थेचे अध्यक्ष हभप सोपनकाका वाल्हेकर महाराज, कार्याध्यक्ष नागेश मोरे, संपर्क अधिकारी सत्यजित खांडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
आज भारतभर इंदोरचे स्वच्छ शहर म्हणून कौतुक होते, कारण आम्ही कचरा दाखविणारे लोकं नाही तर पुढे होऊन कचरा गोळा करून स्वछता करणारे लोकं आहोत म्हणून.. इंदोर आज अनेक वर्षे सलग पाहिला क्रमांक मिळवित आहे. पुरस्कारार्थीनी असे पुढे येऊन आपापल्या क्षेत्रात काम करावे म्हणजे भारत महासत्ता म्हणून लवकर पुढे जाईल, असे सुमित्रा महाजन म्हणाल्या.
संत हा शब्द अनेक ठिकाणी पोथ्या पुराणांत आपण वाचतो पण या संतत्वाची खरी पहिली व्याख्या करणाऱ्या संत मुक्ताबाई आहेत. त्यांच्या नावाने पुरस्कार मिळणं म्हणजे कामाची योग्य पावती असल्याचे मत संत साहित्याचे अभ्यासक आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती महामंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले. छोट्या मुक्ताईने योगी चांगदेवांना उपदेश केला इतके त्यांचे ज्येष्ठत्व महत्त्वाचे आहे. म्हणून आज ज्यांना मुक्ताबाईंच्या नावाचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांची जबादारी वाढलेली आहे, असे डॉ. मोरे म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकृष्ण मोरे यांनी केले तर कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक आत्मोन्नती व विश्वशांती संस्थेचे अध्यक्ष ह.भ. प. सोपनकाका वाल्हेकर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रा. सत्यजित खांडगे यांनी मानले.
आदिशक्ती मुक्ताई स्मृतिगौरव पुरस्कार मानकरी
१) डॉ. सुचित्रा कराड-नागरे
२)डॉ. भाग्यश्री पाटील
३)प्रा. डॉ.ज्योत्स्ना एकबोटे
४) सौ. सारीक भेगडे
५)सौ. तृप्ती पाटील
६)डॉ. वंदना मुरकुटे
७)सौ. आशाताई भालेकर
८)सौ. छायावती देसले
९)ऍड. श्रुती कुलकर्णी
समाजभूषण गौरव पुरस्कार मानकरी
१) मा. अभिजित पाटील
२)मा.किरण गांधी
३)श्री अशोक जाधव
४)श्री किशोर खेडकर
५) प्रा. सत्यजित खांडगे
६)श्री नागेश मोरे





