वालचंद संचेती यांना ‘महात्मा फुले ज्ञानरत्न पुरस्कार’ प्रदान
Updated On:

पुणे : पुणे कॅन्टोन्मेंट पुस्तक पतपेढी तर्फे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात अतुलनीय कार्य केल्याबद्दल कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष वालचंद संचेती यांना ‘महात्मा फुले ज्ञानरत्न पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. कॅम्प एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेमध्ये ५१ वर्षे तसेच पूना मर्चंट चेंबर्स या व्यापारी संस्थेमध्ये मागील ६० वर्षे ते कार्यरत आहेत.
इतर सामाजिक उपक्रमांमध्ये देखील संचेती यांचा मोलाचा वाटा असतो. पदमश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या विलु पुनावाला इंग्रजी माध्यम शाळेस देखील ‘आदर्श शाळा पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.
सदर कार्यक्रमास पदमश्री गिरीश प्रभुणे, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, ॲड. अर्जुन खुरपे, दिलीप बुधानि व इतर मान्यवर उपस्थित होते.




